दीड लाख विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
By Admin | Published: February 11, 2017 12:38 AM2017-02-11T00:38:39+5:302017-02-11T00:38:50+5:30
नाशिक विभाग : जिल्ह्यातून ७४ हजार परीक्षार्थी
नाशिक : नाशिक विभागाअंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्णांमधून सुमारे १ लाख ६८ हजार २८७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. नाशिक जिल्ह्णातून सर्वाधिक ७४ हजार ७१९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
कनिष्ठ महाविद्यालयामधील बारावीची परीक्षा अखेरची समजली जाते. या परीक्षेच्या निकालावरच विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाटा खुल्या होतात. येत्या २८ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला राज्यभरात सुरुवात होत असून, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागानेदेखील परीक्षेच्यादृष्टीने सर्व तयारी केली आहे. मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांचे मिळून संपूर्ण नाशिक विभागातून एक लाख ६८ हजार २८७ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. यासाठी मंडळाने एकूण २१८ कें द्र तयार ठेवले असून, परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण झाल्याचे मंडळाचे नाशिक विभागाचे सचिव राजेंद्रप्रसाद मारवाडी यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्णासाठी ८६ कें द्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.
धुळे जिल्ह्णातून २५ हजार ४७४, जळगावमधून ५१ हजार ७०९, नंदुरबार येथून १६ हजार ३५५ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. विभागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षांना सुरुवात झाली आहे. निवडणूक संपताच बारावीच्या लेखी परीक्षेला प्रारंभ होणार आहे. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पाडून पारदर्शी निकाल लावण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याहीप्रकारचे मनावर दडपण न ठेवता परीक्षेची भीती न बाळगता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन मारवाडी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)