दीड लाखाचे सागवान जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 02:11 PM2020-02-18T14:11:22+5:302020-02-18T14:11:28+5:30
पेठ - महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमारेषेवर चोरटी सागवान लुटीचे प्रकार सुरूच असून पेठ तालुक्यातील आंबे वनपरिक्षेत्रात जवळपास दीड लाखाचे सागवान जप्त करण्यात आले आहे.
पेठ - महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमारेषेवर चोरटी सागवान लुटीचे प्रकार सुरूच असून पेठ तालुक्यातील आंबे वनपरिक्षेत्रात जवळपास दीड लाखाचे सागवान जप्त करण्यात आले आहे. तालुक्याच्या उत्तरेस गांडोळे परिसरातील जंगलात गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाला अवैद्यविक्र ीच्या उद्देशाने चौपट केलेले २.२५ घ.मी. सागवान लाकूड जंगलात दडवून ठेवल्याचे दिसून आले. वन विकास महामंडळाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी सदरचे लाकूड पंचनामा करून जप्त करत पेठच्या डेपोत जमा केले. याप्रसंगी वनरक्षक एस.बी. राऊत, सी.जे. चौरे, एम.जी. वाघ, पोलीस नाईक एच.पी. गवळी यांचे सह वन कर्मचारी जप्ती मोहीमेत सहभागी झाले होते. आंबे, झरी, बोरधा या भागात अजून ही थोडेफार सागवान शिल्लक असतांना आता सागवान तस्करांनी याच परिसराला आपले लक्ष करत वनविभागापुढे आवाहन ऊभे केले आहे.