दररोज दीड हजार किलो ‘कोविड बायो वेस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 01:23 AM2020-08-10T01:23:19+5:302020-08-10T01:23:54+5:30
नाशिक शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने ‘कोविड बायो वेस्ट’चे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. दररोज दीड हजार किलो इतका कचरा कोविडच्या सरकारी व खासगी रुग्णालयांमधून संकलित करत त्याची योग्य त्यापद्धतीने खबरदारी घेत विल्हेवाट लावली जात आहे. एकूणच कोरोनाच्या संक्रमणामुळे आता रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आणि सर्वच बाबींवर ताण वाढताना दिसत आहे.
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने ‘कोविड बायो वेस्ट’चे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. दररोज दीड हजार किलो इतका कचरा कोविडच्या सरकारी व खासगी रुग्णालयांमधून संकलित करत त्याची योग्य त्यापद्धतीने खबरदारी घेत विल्हेवाट लावली जात आहे. एकूणच कोरोनाच्या संक्रमणामुळे आता रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आणि सर्वच बाबींवर ताण वाढताना दिसत आहे.
मागील काही दिवसांपासून कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने सरकारी व खासगी कोविड रुग्णालये धरून एकूण ५० ते ५५ रुग्णालयांमधून कोविड वैद्यकीय कचरा अर्थात डॉक्टर, परिचारिकांनी वापरलेले पीपीई सूट, हातमोजे, हेड कॅप, मास्क आदींचे संकलन एका खासगी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांमार्फत केले जात आहे. यासोबतच दररोज निघणाºया नॉनकोविड बायो वेस्टचे प्रमाणदेखील वाढले असून, दिवसाला तो कचरा तीन हजार किलोपर्यंत जाऊन पोहोचला आहे. शहराबाहेर एका मोकळ्या जागेत असलेल्या प्रकल्प केंद्रावर या कचºयाची विल्हेवाट लावली जात आहे. त्यासाठी येथे कार्यरत असलेली कामगारांची फळी अहोरात्र झटत ‘कोरोना योद्धा’ची भूमिका बजावताना दिसून येते.
८०० ते १००० तापमानाखाली कचरा नष्ट
कोविडचा कचरा ज्या बॅगमध्ये भरलेला असतो ती बॅगदेखील विशिष्टप्रकारची असते. त्यामधून कुठल्याहीप्रकारे कचरा सांडणार नाही, याची खबरदारी घेतलेली असते. प्रकल्पावर इन्फिनिरेशन प्रक्रि येद्वारे कचरा प्रथम ८५० ते ९०० डिग्री तापमानात जाळला जातो. त्यानंतर या कचºयाची राखदेखील १००० डिग्री इतक्या तापमानात जाळली जाते. राख पाण्याने थंड करून ईटीपीद्वारे त्यावर पुनर्प्रक्रि या करून पाण्याचा पुनर्वापर केला जातो. या सर्व प्रक्रि येसाठी व शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे १२५ कर्मचारी अहोरात्र झटत आहेत.