जिल्'ात पुन्हा २४ तासांत दीड हजार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 11:21 PM2020-09-12T23:21:08+5:302020-09-13T00:25:14+5:30
नाशिक : शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे थैमान सुरू आहे. मागील ४८ तासांत ३ हजार १३८ रुग्ण जिल्'ात वाढले, तर शनिवारी (दि.१२) दिवसभरात १ हजार ५६९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. शुक्रवारीदेखील १ हजार ५५१ रुग्ण मिळून आले होते. शनिवारी उपचारार्थ दाखल १५ रुग्ण दगावल्याने आता मृतांचा आकडा १ हजार ५० इतका झाला आहे. तसेच १ हजार ६६ रुग्ण २४ तासांत बरे झाले आहेत.

कोरोनाग्रस्तांचा आकडा अधिकच उंचावत असल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी जिल्'ात आतापर्यंत सर्वाधिक २९ रुग्ण उपचारादरम्यान दगावले होते. त्यानंतर सलग दोन दिवसांत ३० रुग्ण मृत्युमुखी पडले. जिल्'ात दररोज दीड हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने आता प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. मागील आठवडाभरापासून शहरापाठोपाठ जिल्'ातही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शनिवारी नाशिक शहरात एक हजार ५०, ग्रामीणमध्ये ४४६, तर मालेगावात ७२ नवे कोरोनाचे रुग्ण मिळाले. यामुळे आता जिल्'ाचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५३ हजार ३२९ इतका झाला आहे. यामध्ये शहरात ३५ हजार ९७४, ग्रामीणमध्ये १२ हजार ९८०, मालेगावात तीन हजार १२४ आणि जिल्'ाबाहेरील २५१ रुग्णांचा समावेश आहे. जिल्'ात आतापर्यंत ४० हजार ८६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १० हजार ४१५ रुग्ण सध्या उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ३३ हजार ८४८ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. एकूण १ हजार ९३३ रुग्णांचे नमुना चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. शनिवारी शहरात ५, तर ग्रामीणमध्ये ९ रुग्ण आणि जिल्हाबाहेरील १ अशा १५ रुग्णांंचा मृत्यू झाला. दिवसभरात जिल्'ात २ हजार ५८ संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
खबरदारीबाबत उदासीनता नको
नाशिककरांनी कोरोनाला हरविण्यासाठी खबरदारी घेणे तितकेच गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत उदासीनता बाळगणे धोक्याचे ठरू शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना योग्य त्या सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क अवश्य बांधावा, वेळोवेळी आपले हात निर्जंतुक करावे आणि सामाजिक अंतर टिकवून ठेवावे, या सूचना कटाक्षाने पाळाव्यात, असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे म्हणाले.