टमाटा दीड रुपये किलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 12:58 PM2019-12-03T12:58:35+5:302019-12-03T12:58:55+5:30

पांडाणे : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका टमाट्यालाही बसला असून कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २० किलोच्या कॅरेटला ३० ते ८० रूपये भाव मिळत आहे.

 One and a half tomatoes! | टमाटा दीड रुपये किलो !

टमाटा दीड रुपये किलो !

Next

पांडाणे : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका टमाट्यालाही बसला असून कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २० किलोच्या कॅरेटला ३० ते ८० रूपये भाव मिळत आहे.
दिंडोरी तालुक्यात नगदी पिक संबोधले जाणाऱ्या टमाटा पिकाला उतरती कळा लागली असून निर्यातक्षम टमाटा चार रु पया ते सहा रूपये किलो भावापर्यंत घसरला आहे. लाल व गारशेल (कवडी फुटलेला ) टमाटा प्रती किलो दिड ते दोन रु पये व प्रति कॅरेट तिस ते ऐंशी रु पये एवढा भाव मिळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे .
दिंडोरी तालुक्यात टमाटापिकाची लागवड पांडव पंचमीला पिकाची मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु यावर्षी टमाटा लागवडीच्या वेळीच परतीच्या पावसामुळे रोपे खराब झाली. त्यानंतर बळीराजाने एक रु पये तिस पैसे प्रमाणे एका टमाटा रोपाच्या काडीला मोजून टमाटा लागवड केली . लागवड केलेला टमाटा सतत कोसळणाºया पावसामुळे खराब झाला. काही भागातील टमाटा वाचविण्यासाठी बळीराजाला अतोनात मेहनत करावी लागली . पावसाने उघडीप दिल्याानंतर औषधांची फवारणी , धुरळणी करून एकरी पन्नास ते साठ हजार रु पये खर्च झाला .टमाटा मार्केटला गेल्यानंतर आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवडयात प्रति कॅरेट (विस किलो ) सातशे ते आठशे रु पये बाजार मिळत होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात १०० पासून ते ३०० रूपयांपर्यंत टमाटा व्यापारी खरेदी करायला लागल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या पिकाला अमोनिया , सम्राट या सारखी महागडी खते वापरून खराब झालेल्या टमाट्याला जीवदान दिले. परंतु डिसेंबर महिन्यात प्रारंभीच टमाट्याला दिड ते दोन रु पये किलो भाव मिळू लागल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

 

Web Title:  One and a half tomatoes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक