जेलरोड येथील कपलीकर खूनप्रकरणी एकास अटक

By Admin | Published: August 2, 2016 02:16 AM2016-08-02T02:16:15+5:302016-08-02T02:16:52+5:30

जेलरोड येथील कपलीकर खूनप्रकरणी एकास अटक

One arrested in connection with the murder of Kapilik in Jail Road | जेलरोड येथील कपलीकर खूनप्रकरणी एकास अटक

जेलरोड येथील कपलीकर खूनप्रकरणी एकास अटक

googlenewsNext

नाशिकरोड : जेलरोड राजराजेश्वरी चौकाजवळील उमाभक्ती अपार्टमेंटमधील नंदा कपलीकर या महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे.
राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळील उमाभक्ती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नंदा अनिल कपलीकर (५०) या महिलेचा तिच्याच फ्लॅटमध्ये गेल्या बुधवारी मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मयत नंदा हीच्या मोबाइलवर येणारे-जाणारे फोन व घरी येणाऱ्यांची माहिती घेत तपास चालविला होता.
पोलिसांनी याप्रकरणी जवळपास २५ ते ३० जणांची चौकशी केली होती. मात्र, काहीजण पोलिसांकडे चौकशीला न आल्याने पोलिसांनी संशयावरून त्यांच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी बोलविले असता खुनाच्या घटनेनंतर एकजण पळून गेल्याची बाब समोर आली. त्यानुसार पोलिसांनी संशयित अरुण किसन बोरसे (३२) रा. रोकडोबावाडी, देवळालीगाव यास सोमवारी सायंकाळी सातपूर शिवाजीनगर येथून ताब्यात घेतले. संशयित अरुण हा रिक्षाचालक व बॅँजो वाजविण्याचा व्यवसाय करतो. तपासामध्ये आढळलेल्या बाबीविषयी पोलीस सूत्रांनी सांगितले की, संशयित अरुण याचे मयत नंदा यांच्या घरी येणे-जाणे होते. त्यांच्यात काही कारणावरून वादही होते.
रविवारी सायंकाळी अरुण हा तिच्या घरी गेला असता त्यांच्यात पुन्हा वादविवाद होऊन झटापट झाली. यावेळी नंदा हीने प्रतिकारदेखील केला. मात्र अरुण याने दोरीने तिचा गळा आवळत खाली पाडल्याने ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिचे हात बांधून व कापडाने गळा आवळल्याची त्याने कबुली दिली. अरुण याला नंदा ही प्रारंभी बेशुद्ध पडली, असे वाटले होते. ती शुद्धीवर आल्यावर पोलिसांकडे तक्रार करेल, अशी भीती अरुणला होती. मात्र बुधवारी सायंकाळी नंदा ही मयत झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तो मुंबई व इतर ठिकाणी पळून गेला होता. याप्रकरणी पोलिसांनी कसोशीने तपास करीत या खुनाचा उलगडा केला. (प्रतिनिधी)

Web Title: One arrested in connection with the murder of Kapilik in Jail Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.