दस्त चोरीप्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:04 PM2021-03-11T23:04:07+5:302021-03-12T00:52:29+5:30
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील मध्यवर्ती अभिलेख कार्यालयातून जतन करावयाचे अंगठे पुस्तक, महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज वरिष्ठ लिपिक रजेवर असताना संशयित सुनील गजानन पवार (रा. पंचक, जेल रोड) याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय रामदास ठाकरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

संशयित पवार याच्या मदतीने संशयित विजय दत्तात्रय भागवत आणि दत्तात्रय सहादू भागवत या दोघांनी संगनमताने मृत सुधाकर बळवंत पाटील यांच्या देवळाली कॅम्पमधील शेतजमिनीविषयीचे बनावट रद्दबातल खरेदीखत तयार केल्याची फिर्याद अंकुश सुधाकर पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. त्यांच्या तक्रार अर्जाची दखल घेत आयुक्तांच्या आदेशान्वये पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विजय भागवत याला सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे.
भागवत याने पवारच्या मदतीने बनावट दस्त तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे. अभिलेख कार्यालयातून गहाळ झालेले महत्त्वाच्या सरकारी दस्तऐवजामागेही या प्रकरणाचा संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पाटील यांच्या वारसाची नोंद रद्दबातल ठरविण्यासाठी बनावट दस्त सादर करून संशयित भागवत याने देवळाली मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात २०१७ साली आक्षेप घेतला होता; मात्र ज्या दस्तांच्या आधारे आक्षेप घेतला गेला, ते दस्तऐवज बनावट असल्याचे दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांनी सिद्ध केले आहे.
कार्यालयाने याबाबत सुनावणीही घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणी विजय भागवत यास न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यास आज, शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच हा गुन्हा आता सरकारवाडा पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.