मालेगावी गावठी कट्ट्यासह एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:47 AM2018-11-12T01:47:52+5:302018-11-12T01:48:26+5:30
मालेगाव येथील मनमाड चौफुली परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयित इसम मंजूर हुसेन मुजफ्फर हुसेन (३४) रा. गुलशने मालिक, स. नं. १०७ यास अटक केली.
मालेगाव : येथील मनमाड चौफुली परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयित इसम मंजूर हुसेन मुजफ्फर हुसेन (३४) रा. गुलशने मालिक, स. नं. १०७ यास अटक केली. त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल, सात जिवंत काडतुसे व दोन मॅग्झीनसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी किल्ला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या पथकाने मनमाड चौफुली परिसरात हॉटेल साईसिद्धी समोर अग्निशस्त्रे बाळगणाºया इसमास ताब्यात घेतले. रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी मालेगाव शहरात सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना खबºयामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मनमाड चौफुली परिसरात काही संशयित इसम अवैधरीत्या अग्निशस्त्रे बाळगून गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने हॉटेल साईसिद्धीसमोर सापळा रचून संशयित मंजूर हुसेन मुजफ्फर हुसेन (३४) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कब्जातून एक देशी बनावटीचे पिस्तूल, सात जिवंत काडतुसे, दोन मॅग्झीनसह गुन्ह्यात वापरलेली होण्डा शाइन दुचाकी हस्तगत करण्यात आली. विनापरवाना घातक अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या आठवड्यात अवैधरीत्या अग्निशस्त्र बाळगणाºया एकूण सहा आरोपींविरुद्ध कारवाई केली होती. पथकात सहायक पोलीस निरीक्षक सुनील अहिरे, हवालदार राजू मोरे, वसंत महाले, सुहास छत्रे,
राकेश उबाळे, देवा गोविंद, फिरोज पठाण, रतिलाल वाघ यांचा समावेश आहे.