चंदनाची झाडे चोरणाऱ्या एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 01:09 AM2021-11-25T01:09:39+5:302021-11-25T01:11:33+5:30
ओझर येथील एअरफोर्स हद्दीत प्रवेश करीत चंदनाचे दोन झाडे कापून त्याचे ओंडके करून चोरून घेऊन जात असताना एअरफोर्स पोलिसांनी एका चोरट्यास पकडून ओझर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून एका चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडील चंदनाच्या तीन ओंडक्यासह १२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ओझर : येथील एअरफोर्स हद्दीत प्रवेश करीत चंदनाचे दोन झाडे कापून त्याचे ओंडके करून चोरून घेऊन जात असताना एअरफोर्स पोलिसांनी एका चोरट्यास पकडून ओझर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून एका चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडील चंदनाच्या तीन ओंडक्यासह १२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सोमवारी (दि.२२) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अशोकनाथ केदार (रा. ओतुर, पुणे), अशोक बाळू वारे व कृष्णा पांडुरंग पारधी (पत्ता माहीत नाही) यांनी मोटारसायकलने येऊन एअरफोर्स संपूर्ण प्रतिबंधित असलेल्या परिसरातील दोन चंदनाचे झाडे तोडून त्याचे ९, ५, ४ फुटाचे ओंडके करून ते चोरून घेऊन जात असताना एअरफोर्स पोलिसांनी अशोक केदार यास पकडले. दरम्यान दोन जण पळून गेले. एअरफोर्स पोलिसांनी अशोक केदार यास मंगळवारी (दि.२३) रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास ओझर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अशोक केदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याबाबत अधिक तपास हवालदार बी. जी. आहेर करीत आहेत.