रस्ते बांधकामासाठी एक कोेटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:38 AM2018-07-14T00:38:00+5:302018-07-14T00:38:24+5:30

नाशिक : नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाल्यानंतर आता आदिवासी व बिगर क्षेत्रातील रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेस ११४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी दिली. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त निधी मिळाल्याने ग्रामीण भागातील मार्ग व इतर जिल्हा मार्गांची दुरुस्ती कामास चालना मिळेल, असेही पवार यांनी सांगितले.

 One co-fund for construction of roads | रस्ते बांधकामासाठी एक कोेटीचा निधी

रस्ते बांधकामासाठी एक कोेटीचा निधी

googlenewsNext

नाशिक : नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाल्यानंतर आता आदिवासी व बिगर क्षेत्रातील रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेस ११४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी दिली. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त निधी मिळाल्याने ग्रामीण भागातील मार्ग व इतर जिल्हा मार्गांची दुरुस्ती कामास चालना मिळेल, असेही पवार यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ११४ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. निधीमुळे रस्ते विकासाला चालना मिळणार आहे. आदिवासी उपयोजनेसाठी १० कोटी ६५ लाख, आदिवासी उपयोजना किमान गरजांसाठी ३ कोटी ६० लाख, आदिवासी उपयोजना माडासाठी ५ कोटी ३६ लाख ५२ हजार, आदिवासी उपयोजना माडा १ कोटी, आदिवासी उपयोजना अतिरिक्त ३७ कोटी ६९ लाख, आदिवासी उपयोजना २० कोटी तर बिगर आदिवासींसाठी १९ कोटी, याप्रमाणे निधी लेखाशीर्ष करण्यात आले आहे.

Web Title:  One co-fund for construction of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा