त्र्यंबकेश्वरच्या एसटीपीसाठी एक कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:17 AM2021-09-21T04:17:39+5:302021-09-21T04:17:39+5:30
त्र्यंबकेश्वर येथील डॉ. किरण कांबळे आणि स्वप्नील पाटील यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. विशेष म्हणजे केवळ ...
त्र्यंबकेश्वर येथील डॉ. किरण कांबळे आणि स्वप्नील पाटील यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. विशेष म्हणजे केवळ तक्रार हीच याचिका म्हणून दाखल करून घेऊन त्यावर निर्णय दिल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर हे धार्मिक स्थळ असल्याने या ठिकाणी यात्राही भरतात. तसेच हजारो भाविक येत असतात. त्यासाठी तयार करण्यात आलेली व्यवस्था अपूर्ण असून मलमूत्र थेट नदीपात्रात जात असल्याने प्रदूषण होते. यासंदर्भात फोटो आणि अन्य पुरावे हरित लवादाकडे पाठवण्यात आले होते. त्या आधारे लवादाने अनेक आदेश दिले आहेत, मात्र त्यातील निधी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे.
हरित लवादाने दखल घेतल्यानंतर काही महिन्यापूर्वीच उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन संबंधित तक्रारकर्ते आणि नगरपालिकेशी चर्चा केली होती. तसेच नगरपालिकेनेदेखील आराखडा तयार केला होता असे डॉ. कांबळे यांनी सांगितले.