मालेगावी केबीएच विद्यालयात वनदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:13 AM2021-03-22T04:13:16+5:302021-03-22T04:13:16+5:30

उपप्राचार्य विलास पगार, उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, पर्यवेक्षक प्रवीण पाटील, निवृत्ती निकम, संजीव महाले, कार्यालयीन प्रमुख जे. एस. कन्नोर यांच्या ...

One day celebration at Malegaon KBH Vidyalaya | मालेगावी केबीएच विद्यालयात वनदिन साजरा

मालेगावी केबीएच विद्यालयात वनदिन साजरा

Next

उपप्राचार्य विलास पगार, उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, पर्यवेक्षक प्रवीण पाटील, निवृत्ती निकम, संजीव महाले, कार्यालयीन प्रमुख जे. एस. कन्नोर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल रवींद्र नरवडे, ज्येष्ठ शिक्षक एम. आर. अहिरे, सांस्कृतिक विभागाचे राजेश धनवट, राजेंद्र शेवाळे, हरित सेना विभागाचे प्रमुख आनंद भालेराव, उपप्रमुख एस. टी. पवार, डी. के. सोनजे, एच. एन. सोनवणे, एस. के. सूर्यवंशी, नितीन पवार, वामन शिंदे उपस्थित होते.

सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजेंद्र शेवाळे यांचे जागतिक वन दिनानिमित्ताने व्हिडिओद्वारे वनाचे महत्व व त्यांचे संवर्धन या विषयावर व्याख्यान झाले. जंगलतोडीमुळे होणाऱ्या हवामानातील बदलासंदर्भात मार्गदर्शन करून बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल कसा ढासळत चालला आहे, यांचे ज्वलंत उदाहरण कालचा बेमोसमी पाऊस हे सांगून शुद्ध हवा, पिण्याचे पाणी आणि इतर अनेक बाबींसाठी जंगले किती महत्त्वाची आहेत, यासंदर्भात सविस्तर माहिती विशद करुन वन संवर्धन करण्याचे आवाहन शेवाळे यांनी केले. सदर व्हिडिओ सर्व वर्गांच्या विद्यार्थ्यांच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर टाकून वन दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. प्राचार्य पवार यांनी जागतिक वन दिनानिमित्ताने वनाचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.

Web Title: One day celebration at Malegaon KBH Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.