हरिनाम सप्ताहात ‘एक दिवस शेतीसाठी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 05:40 PM2019-06-12T17:40:17+5:302019-06-12T17:40:32+5:30
दिंडोरी : तालूक्यातील बोपेगाव येथे हरिनाम सप्ताहात ‘एक दिवस शेतीसाठी’ हा महाराष्ट्रील पहिलाच प्रयोग उपविभागीय कृषी अधिकारी देवरे यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाला .
Next
दिंडोरी : तालूक्यातील बोपेगाव येथे हरिनाम सप्ताहात ‘एक दिवस शेतीसाठी’ हा महाराष्ट्रील पहिलाच प्रयोग उपविभागीय कृषी अधिकारी देवरे यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाला . यावेळी तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे, पशुसंवर्धन अधिकारी .हायतनगरकर, जगताप, बोपेगाव येथील ग्रामस्थयांच्या उपस्थितीत तालूका कृषी अधिकारी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वासुदेव काठे ,समन्वयक दाभोळकर प्रयोग परिवार यांचे द्राक्ष शेती बाबत सखोल मार्गदर्शन केले. शेतीविषयी जागर १०० टक्के माती व पाणी परिक्षण करण्यासाठी प्रबोधन व सँपलीग गावातच होणार याबाबत रामनाथ जगताप यांनी मार्गदर्शन केले .