खरेदीसाठी एकच दिवस : शासनाकडे मुदतवाढ मागणार एक लाख क्विंटल मका शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 10:46 PM2017-12-29T22:46:57+5:302017-12-30T00:18:50+5:30
नाशिक : खुल्या बाजारात मक्याचे भाव गडगडल्यामुळे राज्य सरकारने आधारभूत किमतीत उत्पादकांचा मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, खरेदी केंद्रांचे उशिराने सुरू होणे व शेतकरी शेतीकामात व्यस्त होण्याच्या घटना एकाच वेळी घडल्यामुळे जिल्ह्णातील सुमारे अडीच हजारांहून अधिक शेतकºयांकडील अंदाजे एक लाख क्विंटल मका खरेदीविना पडून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक : खुल्या बाजारात मक्याचे भाव गडगडल्यामुळे राज्य सरकारने आधारभूत किमतीत उत्पादकांचा मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, खरेदी केंद्रांचे उशिराने सुरू होणे व शेतकरी शेतीकामात व्यस्त होण्याच्या घटना एकाच वेळी घडल्यामुळे जिल्ह्णातील सुमारे अडीच हजारांहून अधिक शेतकºयांकडील अंदाजे एक लाख क्विंटल मका खरेदीविना पडून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या खरेदी केंद्रांना फक्त ३१ डिसेंबरपर्यंतच मका खरेदीची अनुमती देण्यात आल्याचे पाहून व्यापाºयांनी मक्याला अगदीच पडून भाव देण्यास सुरुवात केल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
राज्य सरकारने चालू वर्षीही शेतकºयांकडील मका, भरडधान्य आधारभूत किमतीत खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, पणन महामंडळाने त्यासाठी खरेदी केंद्रे सुरू करावीत, असे आदेश डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच देण्यात आले आहेत. या आधारभूत खरेदी केंद्रामार्फत खरेदी केल्या जाणाºया मक्याला प्रति क्विंटल १,४२५ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. खुल्या बाजारात व्यापाºयांनी मक्याला ९०० ते ११०० इतका कमी दर देऊ केल्याने राज्य सरकारने मका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी शेतकºयांना सातबारा उतारा व पीक पेºयाच्या पुराव्यासह नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. नाशिक जिल्ह्णातील सुमारे २४०० मका उत्पादक शेतकºयांनी पणन महामंडळाकडे नोंदणी केली होती. दरम्यान, खरेदी केलेला मका साठवणूक करण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यासाठी पुरवठा खात्याला गुदाम उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनाने दिले होते, तथापि, गेल्या वर्षीचा मकाच अनेक गुदामांमध्ये साठवून ठेवल्यामुळे गुदामांची शोधाशोध करण्यातच वेळ वाया गेला, कसे बसे गुदामे उपलब्ध झाल्याने खरेदी केंद्रे सुरू होण्यास वेळ लागला. जिल्ह्णात सात खरेदी केंद्रांवर मक्याची खरेदी केली जात असून, शुक्रवारपर्यंत २६,९३७ क्व्ािंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक चौकशी केली असता, ज्या भागात मका अधिक घेतला गेला त्या भागातील शेतकरी गेल्या महिनाभरापासून कांदा लागवडीत व्यस्त आहेत, त्यांनी खरेदी केंद्रांवर फक्त नोंदणी केली, त्यांचा मका अद्याप मळणी यंत्रातून बाहेर पडलेला नाही.