डेंग्यूचे रु ग्ण आढळल्याने एक दिवस पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:51 AM2019-07-22T00:51:59+5:302019-07-22T00:52:29+5:30

शहरात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळल्याने रुग्ण संख्या वाढत असून, याला अटकाव करण्यासाठी पाणीपुरवठ्यात एक दिवसाची पाणीकपात करून कोरडा दिवस करण्याचा आदेश दिल्याची माहिती भगूर नगरपालिका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी व पाणीपुरवठा प्रमुख रवींद्र संसारे यांनी दिली आहे.

One day waterfall due to dengue fever | डेंग्यूचे रु ग्ण आढळल्याने एक दिवस पाणीकपात

डेंग्यूचे रु ग्ण आढळल्याने एक दिवस पाणीकपात

Next

भगूर : शहरात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळल्याने रुग्ण संख्या वाढत असून, याला अटकाव करण्यासाठी पाणीपुरवठ्यात एक दिवसाची पाणीकपात करून कोरडा दिवस करण्याचा आदेश दिल्याची माहिती भगूर नगरपालिका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी व पाणीपुरवठा प्रमुख रवींद्र संसारे यांनी दिली आहे.
भगूर शहरातील लक्ष्मीनारायण रोड व सुतारगल्ली विभागात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले आणि इतरही अनेक रुग्ण नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परस्पर दाखल झाले त्याची दखल आरोग्य अधिकारी नाशिक विभागाने घेऊन मेडिकल शिष्टमंडळाने भगूर शहराला भेट देऊन नगरपालिका प्रशासनाला डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार भगूर नगरपालिकेने गावात रिक्षा फिरवून नागरिकांना आवाहन केले की, परिसर स्वच्छ ठेवावा तसेच आठवड्यातून एकदा सोमवारी शहराला पाणीपुरवठा केला जाणार नसून पाणी वेळेत कपात केली जाणार असल्याचे लेखी आदेशात मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, नगराध्यक्ष अनिता करंजकर, रवींद्र संसारे यांनी आवाहन केले आहे.
सात रुग्ण आढळले
शासनाच्या आरोग्य विभागाने भगूर गावात सात रु ग्ण असल्याचा निष्कर्ष काढल्याचे समजते. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले. भगूरमध्ये दोन रु ग्ण आढळले, आम्ही लगेच उपाययोजना सुरू केल्या आहेत. जर कोणाला लक्षणे दिसली तर पालिका दवाखान्यात यावे.

Web Title: One day waterfall due to dengue fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.