आठवड्यातील एक दिवस ‘खादी डे’

By admin | Published: October 16, 2016 12:50 AM2016-10-16T00:50:27+5:302016-10-16T00:50:48+5:30

निर्णय : शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना परिपत्रक

One day in the week, Khadi Day | आठवड्यातील एक दिवस ‘खादी डे’

आठवड्यातील एक दिवस ‘खादी डे’

Next

शैलेश कर्पे  सिन्नर
खादी वस्त्र म्हटले की डोळ्यांसमोर येतात ती राजकीय नेतेमंडळी. मात्र यापुढे राज्य शासकीय-निमशासकीय अधिकारी व कर्मचारीही आठवड्यातील एक दिवस खादी वस्त्र असलेला पोषाख परिधान केलेले दिसून आल्यास नवल वाटू नये! शासनाने परिपत्रक काढून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर सोमवारी खादी वस्त्र असलेला पोषाख परिधान करण्याच्या सूचना केल्या आहेत.
खादी वस्त्र विक्रीत वाढ होऊन ग्रामीण भागात खादी वस्त्र उत्पादन करण्यात कारागिरांना सहाय्यभूत व्हावे तसेच खादी वापरास प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाने सदर निर्णय घेतला आहे. राज्यात शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तहसील कार्यालय, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या शासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालये या निमशासकीय कर्मचाऱ्यांना दर सोमवारी खादी वस्त्र परिधान करावे लागणार असल्याने सोमवार हा एक प्रकारे ‘खादी डे’ असणार आहे.अधिकारी व कर्मचाऱ्यांना खादी वस्त्र खरेदी करणे सुलभ व्हावे यासाठी जिल्ह्यातील दोन प्रमाणित खादी संस्थांची यादी शासनाच्या या परिपत्रकासोबत देण्यात आली आहे.

Web Title: One day in the week, Khadi Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.