विहिरीत कार पडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:35+5:302021-02-05T05:49:35+5:30
सिन्नर: तालुक्यातील पांगरी-पंचाळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत स्विफ्ट कार कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. हा ...
सिन्नर: तालुक्यातील पांगरी-पंचाळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत स्विफ्ट कार कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. हा अपघात होऊन काही दिवस उलटले असल्याचा अंदाज आहे.
दिनेशकुमार नारायण तिवारी (५०) रा. इंदौर (मध्य प्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर व्यक्ती पांगरी-पंचाळे रस्त्याने जात असताना, स्वीट कार (क्र. एम पी ०९ सी आर ६२९४) चे टायर फुटल्याने सदर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या पंचाळे शिवारातील सुधाकर बेदरकर यांच्या विहिरीत उलटली. या कारमध्ये दिनेशकुमार तिवारी होते. कार लॉक असल्याने व काचा बंद केलेल्या असल्याने तिवारी यांना गाडीतून बाहेर येता आले नसावे. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी होते. सदर अपघात नेमका किती दिवसांपूर्वी झाला, हे समजू शकत नाही. तथापि, अपघात होऊन जास्त दिवस झाल्याचा अंदाज आहे. बेदरकर शनिवारी सकाळी विहिरीतील जलपंप सुरू करायला गेल्यानंतर, त्यांना विहिरीतील पाणी कमी झाल्याने कार दिसून आली. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, हवालदार गोरक्ष बलक, गौरव सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून कार काढण्यासाठी वावी येथून क्रेन पाचारण करण्यात आले. मयूर कापुरे यांनी मोठ्या कसरतीने पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने कार विहिरीतून बाहेर काढली. कारमध्ये दिनेशकुमार तिवारी यांचा मृतदेह आढळून आला. अपघात नेमका कधी झाला, हे समजू शकले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
----------------------
अपघात महिन्यापूर्वी झाला असल्याचा अंदाज आहे. कार पाण्याने अक्षरशः गंजली होती. गाडीच्या काही भागावर शेवाळ आले होते. विहिरीचे पाणी कमी झाल्यानंतर कार दिसली. त्यानंतर, विहिरीतून बाहेर काढली.
---------------
सिन्नर तालुक्यातील पंचाळे- पांगरी रस्त्यावर विहिरीत पडलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. (३० सिन्नर१)
===Photopath===
300121\30nsk_5_30012021_13.jpg
===Caption===
३० सिन्नर १