दुचाकी खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 20:09 IST2021-11-28T20:09:52+5:302021-11-28T20:09:52+5:30
मालेगाव: तालुक्यातील काष्टी गावाजवळ निळगव्हाण शिवारात गुरुवारी सायंकाळी दुचाकी क्र. एमएच ४१ एसी १६४५ वरील चालक देवीदास श्रीपद पवार (५४) रा. पंचशीलनगर कॅम्प यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला खड्ड्यात दुचाकी पडून त्यांचा मृत्यू झाला.

दुचाकी खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू
ठळक मुद्देस्वत:च्या मृत्यूस कारणीभूत
मालेगाव: तालुक्यातील काष्टी गावाजवळ निळगव्हाण शिवारात गुरुवारी सायंकाळी दुचाकी क्र. एमएच ४१ एसी १६४५ वरील चालक देवीदास श्रीपद पवार (५४) रा. पंचशीलनगर कॅम्प यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला खड्ड्यात दुचाकी पडून त्यांचा मृत्यू झाला.
स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक राजू विटोकर यांनी फिर्याद दिली. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.