विषारी औषध सेवन केल्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:13 AM2021-05-23T04:13:25+5:302021-05-23T04:13:25+5:30
---------------------------- पुलांच्या कामांना वेग देण्याची मागणी सिन्नर : सिन्नर-शिर्डी या सुमारे ६० किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. ...
----------------------------
पुलांच्या कामांना वेग देण्याची मागणी
सिन्नर : सिन्नर-शिर्डी या सुमारे ६० किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामाने वेग घेतला आहे. तथापि, पुलांची कामे पाहिजे त्याप्रमाणात वेगाने होत नसल्याचे चित्र आहे. मुंबईसह उपनगरातील भाविक मोठ्या प्रमाणात शिर्डीला येत असतात. त्यामुळे या महामार्गाने मोठी वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर या मार्गावर पायी जाणाऱ्या पदयात्रेकरूंसाठी पालखी मार्ग असणार आहे. या रस्त्याचे काम प्रगतिपथावर असले तरी पुलांच्या कामांना वेग देण्याची गरज आहे.
------------------------------
वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटातील वनउद्यानाजवळ अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या युवकास पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाल्मीक रामगोपाळ विश्वकर्मा (३२), रा. माळेगाव, ता. सिन्नर, मूळ रा. मध्यप्रदेश हा रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यास जोरदार धडक दिली. त्यानंतर वाहने फरार झाले. या अपघातात विश्वकर्मा याचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------
वावी बसस्थानकाचे काम रखडले
सिन्नर : तालुक्यातील वावी येथील बसस्थानकाचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडले आहे. बसस्थानक उभे राहिले असले तरी बसस्थानकाचा तळ अद्याप काँक्रिटीकरण करणे बाकी आहे. बसस्थानकात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्वच्छतागृहाचीही दूरवस्था झाली आहे. सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीतून बनविण्यात आलेल्या बसस्थानकाचे काम रखडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
----------------------------------
मलढोण येथे दाम्पत्यावर हल्ला
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील मलढोण येथे दाम्पत्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाल्याची घटना घडली असून वावी पोलिसांनी आठ संशयितांविरोधात दंगा व दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे. नवनाथ बालाजी पावले (३८) हे घरासमोर बसलेले असताना मच्छिंद्र पावले हा शिवीगाळ करीत चालला असताना नवनाथ यांनी कोणाला शिवीगाळ करतो, असे विचारल्यावर संशयिताने फोन लावून इतरांना बोलावून घेत मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.