पाझर तलावात बुडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 18:47 IST2020-11-05T18:46:58+5:302020-11-05T18:47:43+5:30
सटाणा : पीर बाबाचा नवस फेडून घरी जात असताना एकाचा पाझर तलावात पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पाझर तलावात बुडून एकाचा मृत्यू
सटाणा : पीर बाबाचा नवस फेडून घरी जात असताना एकाचा पाझर तलावात पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.
अजमिर सौंदाणे येथील रहिवाशी भीमबाजी सुकराम माळी (४८) हे गुरुवारी (दि.५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील पीरबाबाचा नवस फेडण्यासाठी गेले होते. देवदर्शन करून घरी परतीच्या मार्गावर असताना गावानजीकच्या पाझर तलावावरून येत असताना अचानक पाय घसरून भीमबाजी पाण्यात बुडाले. ही दुर्घटना पाहून तत्काळ आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेऊन पाण्यात बुडालेल्या भीमबाजी यांना बाहेर काढून तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.