एक कारखाना, तीन कामगार संघटना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:46 AM2019-08-31T00:46:24+5:302019-08-31T00:46:43+5:30

अवघ्या शंभर कायम कामगारांची संख्या असलेल्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील ड्रिलबिट कंपनीत तब्बल तीन कामगार संघटना कार्यरत असून, त्यातील एका संघटनेचे सदस्य असलेले जवळपास ८० कामगार गेल्या २३ दिवसांपासून संपावर आहेत, तर दुसऱ्या संघटनेचे सदस्य असलेल्या १४ कामगारांचा नुकताच वेतनवाढीचा करार झाला आहे. तिसºया संघटनेमध्ये नेमके किती कामगार आहेत.

 One factory, three trade unions! | एक कारखाना, तीन कामगार संघटना !

एक कारखाना, तीन कामगार संघटना !

Next

सातपूर : अवघ्या शंभर कायम कामगारांची संख्या असलेल्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील ड्रिलबिट कंपनीत तब्बल तीन कामगार संघटना कार्यरत असून, त्यातील एका संघटनेचे सदस्य असलेले जवळपास ८० कामगार गेल्या २३ दिवसांपासून संपावर आहेत, तर दुसऱ्या संघटनेचे सदस्य असलेल्या १४ कामगारांचा नुकताच वेतनवाढीचा करार झाला आहे. तिसºया संघटनेमध्ये नेमके किती कामगार आहेत. याची कोणाला माहिती नाही, कामगार संघटनांचे हे त्रांगडे पाहता त्यातून कामगारांचा प्रश्न सुटण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील ड्रिलबिट कंपनीत अवघ्या १०० च्या आसपास कायम कामगारांची संख्या आहे. तरीही तब्बल तीन कामगार संघटना या कामगारांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यातील समर्थ कामगार संघटनेकडे १४ सभासद आहेत. सिटूप्रणीत नाशिक वर्कर्स युनियनकडे जवळपास ८० सभासद आहेत. (या कामगारांनी २३ दिवसांपासून संप पुकारलेला आहे) तर ड्रिलबिट इंडिया अंतर्गत कामगार संघटनेकडे ५ ते ६ सभासद असतील. या तीनही कामगार संघटनेच्या सभासदांमध्ये प्रचंड चढाओढ निर्माण झाली आहे. कामगारांमधील अंतर्गत वादाचा फायदा व्यवस्थापनालाच होत असून, विविध संघटनांमध्ये विखुरलेल्या कामगारांमध्ये एकजूट होत नसल्याने दिवसेंदिवस प्रश्न चिघळत चालला आहे.
सुविधा मिळणार
महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना आणि ड्रिलबिट कंपनी व्यवस्थापन यांच्यात २७ आॅगस्ट रोजी वेतनवाढीचा करार करण्यात आला. या संघटनेच्या १४ सभासदांना करारानुसार दरमहा ८ हजार ९०० रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे. त्याचबरोबर मेडिक्लेम आणि बंद पडलेली कॅण्टीन सुविधा मिळणार आहे. या करारावर व्यवस्थापनाच्या वतीने प्लॅण्ट हेड बर्नाड कोन्हेन, एम.एस. कासलकर, रूपेश परदेशी, दीपक कुलकर्णी, असिफ शेख, तर युनियनच्या वतीने जगन्नाथ सरवार, राकेश अहिरे, सुनील घाडगे, विलास नेटावटे, नामदेव बागुल, दिगंबर गायकवाड आदींनी स्वाक्षºया केल्या.
विरोधाभास
कामगारांच्या मागण्यांसाठी सिटूचे नेतृत्व स्वीकरलेल्या ८० कायम कामगारांनी ६ आॅगस्टपासून संप पुकारला आहे. पूर्वी हे कामगार महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचेच सभासद होते. गेल्या २३ दिवसांपासून हे कामगार संपावर आहेत. या संपकरी कामगारांच्या समोरच वेतनवाढीचा करार केलेल्या १४ कामगारांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. एकीकडे आनंदोत्सव, तर दुसरीकडे प्रचंड रोष असे चित्र निर्माण झाले होते.

Web Title:  One factory, three trade unions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.