वडाळागावात पाच संशयितांकडून एकावर शस्त्राने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 09:40 PM2018-10-27T21:40:25+5:302018-10-27T21:40:47+5:30
नाशिक : भावास शिवीगाळ केल्याची कुरापत काढून पाच संशयितांनी एकास बेदम मारहाण करीत धारदार शस्त्राने वार केल्याची घटना वडाळागावातील म्हाडा कॉलनीत घडली आहे़ मोसीम ऊर्फ चिड्या शहा (३३, रा. म्हाडा वसाहत) हे मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि़२५) रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित काल्या ऊर्फ ग्यासउद्दिन शेख व त्याच्या चौघा साथीदारांनी मोसीम शहा यांना माज्या भावास तुज्या नातलगांनी शिवीगाळ का केली अशी कुरापत काढली़ यानंतर चौघांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, तर संशयित बशीर ऊर्फ शेऱ्या याने मोसीनवर धारदार हत्याराने वार केले़
या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित शाहरुख शेख (२२, रा. मेहबूबनगर) आणि वशील सय्यद (३१, रा. वडाळा) या दोघांना अटक केली आहे.
चक्कर येऊन पडल्याने युवकाचा मृत्यू
नाशिक : पंचवटीतील मालेगाव स्टॅण्डवर अचानक चक्कर येऊन पडल्याचे ३२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ हरिष राजपालगिरी गोसावी (रा.जनार्दननगर,नांदूरनाका) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. अचानक चक्कर येऊन पडल्याने हरिष यास त्याचे मामा राजेंद्र गोसावी यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोदावरी नदीपात्रात मृतदेह
नाशिक : चोपडा लॉन्सजवळील नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवारी (दि़२६) दुपारच्या सुमारास घडली़ साधारणत: ३५ ते ४० वयोगटांतील इसमाचा हा मृतदेह असून, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही़ दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.