एकीकडे मनोमिलनाचा दावा, दुसरीकडे बंडाची भाषा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 06:34 PM2019-03-13T18:34:07+5:302019-03-13T18:34:45+5:30

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी दररोज नवनवीन दावेदार पुढे येऊन आपल्या विजयाचे दावे करीत असल्यामुळे उमेदवारीसाठी ...

On one hand, the language of rebellion, on the other hand, is a rebellion | एकीकडे मनोमिलनाचा दावा, दुसरीकडे बंडाची भाषा 

एकीकडे मनोमिलनाचा दावा, दुसरीकडे बंडाची भाषा 

Next
ठळक मुद्देनाशिकचे शिवसैनिक संभ्रमात : उमेदवारीसाठी रस्सीखेच

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी दररोज नवनवीन दावेदार पुढे येऊन आपल्या विजयाचे दावे करीत असल्यामुळे उमेदवारीसाठी सुरू झालेली रस्सीखेच दूर होऊन मातोश्रीवर सर्व दावेदारांचे मनोमिलन झाल्याचा दावा विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी करतानाच त्याबाबतचे उद्धव ठाकरे यांच्यासमवेतचे छायाचित्रही पुराव्यानिशी प्रसिद्धीस दिले असले तरी, त्याच्याच दुसऱ्या दिवशी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी मात्र आपण निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे जाहीर करून अप्रत्यक्ष बंडाची भाषा वापरली आहे. गोडसे, करंजकर यांच्यात उमेदवारीवरून सुरू असलेल्या वादात शिवाजी चुंभळे यांनीही मुंबईत जाऊन संजय राऊत यांची भेट घेतल्यामुळे एकीकडे मनोमिलनाचा दावा केला जात असताना दुसरीकडे इच्छुकांमधील बेबनावदेखील तितकाच चर्चेत आला आहे.


युतीच्या जागा वाटपात आजवर नाशिकच्या जागेवर शिवसेनेनेच दावा सांगत निवडणूक लढविली असून, त्यात यशही मिळविले आहे. गेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव केल्यामुळे तर सेनेसाठी ही जागा आणखीनच महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे यंदाही सेनाच या जागेवरून उमेदवारी करेल हे स्पष्ट असले तरी, उमेदवार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सेनेने अपवादात्मकरीत्या विद्यमान खासदाराच्या उमेदवारीचा पत्ता कट केल्याचा इतिहास असल्यामुळे हेमंत गोडसे यांनीच उमेदवारीवर दावा सांगितला; परंतु त्यांच्या या दाव्याला जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी हरकत घेतली आहे. गेल्या वेळीच पक्षाने आपल्याला शब्द दिला होता, याची जाणीव त्यांनी पक्षश्रेष्ठींना करून देण्यास सुरुवात करतानाच, गोडसेंविरुद्ध मोर्चेबांधणी व स्वत:विषयी मशागत करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गोडसे की करंजकर असा प्रश्न सेनेसमोर कायम असून, त्यातून दररोज मातोश्री दरबारी केल्या जाणाऱ्या तक्रारी, शिष्टमंडळांची भेट या सर्व गोष्टीला वैतागून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी गोडसे, करंजकरांसह काही तालुकाप्रमुख शहरातील पदाधिकाऱ्यांना पाचारण केले. त्यात पक्षप्रमुख अंतिम कौल देतील असे मानले जात असताना दोन्ही गटाने एकमेकांची उणीदुणीच काढल्याने वाद शमण्याऐवजी त्यात वाढच झाली. अशी वस्तुस्थिती असताना हेमंत गोडसे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासमवेत करंजकर व अन्य नेत्यांचे एकत्र काढलेले छायाचित्र समाजमाध्यमातून प्रसिद्ध करून मनोमिलन झाल्याचा दावा केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर ‘चला इतिहास घडवू या’ असे मतदारांना आवाहन करून स्वत:ला उमेदवारी मिळाल्याचे घोषित करून टाकले आहे. त्यांच्या या दाव्याशी मात्र विजय करंजकर सहमत नाहीत. त्यांनी या साºया बाबी फेटाळून लावल्या व कोणतेही मनोमिलन झाले नाही, उलट गोडसे यांच्या विरोधात पक्ष प्रमुखांकडे पदाधिकाºयांनी तक्रारी केल्याचे सांगितले. पक्षाने आपल्याला शब्द दिल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवू असा दावा त्यांनी केला आहे.

Web Title: On one hand, the language of rebellion, on the other hand, is a rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.