एकशेवीस एकर जमिनीचा मालक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:32 AM2018-07-27T00:32:11+5:302018-07-27T00:34:17+5:30

लासलगाव : माता-पित्यांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा कायदा झाला असला तरी आजही संपत्तीच्या मोहापाही रक्ताच्या नात्यांकडून ज्येष्ठांना घरातून हद्दपार करण्याच्या घटना घडत असतात. मात्र, समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण लासलगाव येथील टाकळी विंचुर या गावात समोर आले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात तब्बल एकशे वीस एकर शेतजमिनीचा मालक असलेल्या वयोवृद्धास घरातून काढून दिल्यानंतर टाकळी विंचुर येथील हनुमान मंदिरात वास्तव्यास आलेल्या या वयोवृद्धास तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देत त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली आणि जगण्याचा आधार दिला.

One hundred and acre land owner on the road | एकशेवीस एकर जमिनीचा मालक रस्त्यावर

एकशेवीस एकर जमिनीचा मालक रस्त्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देवृद्धाश्रमात दाखल : सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आधार

शेखर देसाई।
लासलगाव : माता-पित्यांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा कायदा झाला असला तरी आजही संपत्तीच्या मोहापाही रक्ताच्या नात्यांकडून ज्येष्ठांना घरातून हद्दपार करण्याच्या घटना घडत असतात. मात्र, समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण लासलगाव येथील टाकळी विंचुर या गावात समोर आले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात तब्बल एकशे वीस एकर शेतजमिनीचा मालक असलेल्या वयोवृद्धास घरातून काढून दिल्यानंतर टाकळी विंचुर येथील हनुमान मंदिरात वास्तव्यास आलेल्या या वयोवृद्धास तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देत त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली आणि जगण्याचा आधार दिला.
घरातून काढून दिल्यानंतर सैरभैर झालेले हे आजोबा गेल्या आठ दिवसांपासून लासलगाव जवळील टाकळी विंचुर येथील हनुमान मंदिरात वास्तव्यास असून ते आजारी होते. पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांनी याबाबत लासलगावच्या राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे संजय बिरार यांना फोन करून एक आजोबा आठ दिवसापासून टाकळीच्या हनुमान मंदिरात आले आहेत, ते चार दिवसांपासून खूप आजारी आहेत, त्यांना वृद्धाश्रमात पाठवता येईल काय, अशी विचारणा केली. लागलीच संजय बिरार यांनी आजोबांची सेंगऋषी वृद्धाश्रमात व्यवस्था करतो, असे सांगितले आणि आश्रमाचे संचालक नवनाथ जराड यांना फोन करत त्यांना आजोबांची माहिती दिली. आश्रमाचे संचालक नवनाथ जराड यांनीही लगेच होकार दिला आणि आजोबांचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर संजय बिरार ,अजय अनवट व विनायक बसरे(दिनू) हे रिक्षा घेऊन आले. त्यांनी आजोबांशी गप्पा मारल्या. सरुवातीला त्यांनी त्यांच्या गावाचे नाव लाखलगाव सांगितले, मात्र परत विचारणा केली त्यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. आपण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील रहिवाशी असून १२० एकर शेती आहे. मात्र नातेवाईकांनी ती हडपल्याची कर्मकहाणी त्यांनी ऐकवली. त्यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. अखेर आजोबांना सेंगऋषी वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले. ग्रामस्थांकडून आतिथ्यआजोबा गेल्या आठ दिवसांपासून उपाशी होती. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड अशक्तपणा होता. उपाशी असलेल्या या आजोबांना टाकळीच्या ग्रामस्थांनी जेऊखाऊ घातले. त्यांच्या आजारावर उपचार करत त्यांना सोबत औषधेही घेऊन दिली. उपचारानंतर आणि वृद्धाश्रमात दाखल केल्यानंतर बाबांच्या चेहºयावर हसू उमटले आणि त्यांनी सर्वांचे आभार मानले.
 
Web Title: One hundred and acre land owner on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.