ट्रकमधील शंभर लिटर डिझेलवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:18 IST2021-02-25T04:18:14+5:302021-02-25T04:18:14+5:30
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी नवीन आडगाव नाका येथे व्यास रोडलाइन्स ट्रान्सपोर्ट कंपनीत एक ट्रक (एम.एच.१५ बीजे ००३८) हा ...

ट्रकमधील शंभर लिटर डिझेलवर डल्ला
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी नवीन आडगाव नाका येथे व्यास रोडलाइन्स ट्रान्सपोर्ट कंपनीत एक ट्रक (एम.एच.१५ बीजे ००३८) हा नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री उभा करण्यात आला होता. यावेळी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या ट्रकच्या टाकीतून सुमारे शंभर लिटर डिझेलची चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रसाद मधुकर व्यास (४५,रा.हिरावाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पंचवटी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. एकूणच यावरुन आता चोरट्यांनी आपला मोर्चा वाहनात असलेल्या इंधनाकडे वळविल्याचे दिसून येत आहे. वाहनांच्या इंधन टाक्यांमधील इंधनही आता सुरक्षित आहे, याची शाश्वती देता येणार नाही. दुचाकींमधून पेट्रोल चोरीचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत; मात्र मोठ्या चारचाकी वाहनांमधून पेट्रोल, डिझेल गायब करण्याचेही प्रकार वाढू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इंधन दरवाढीचा भडका उडाल्यामुळे इंधन चोरी करण्याचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.