शंभर टक्के उपस्थितीने कर्मचाऱ्यांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 10:03 PM2020-06-03T22:03:27+5:302020-06-04T00:45:49+5:30
नाशिक : लॉकडाउन नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये काम करणाºया सर्व कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात आल्याने कर्मचाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत फिजिकल डिस्टन्स नियमाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत काहीकाळ काम बंद ठेवले.
नाशिक : लॉकडाउन नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये काम करणाºया सर्व कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात आल्याने कर्मचाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत फिजिकल डिस्टन्स नियमाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत काहीकाळ काम बंद ठेवले. वर्कशॉपमध्ये पाणीच नसल्याने सर्व कर्मचाºयांना बोलाविण्यात आल्याचा जाब कर्मचाºयांनी अधिकाºयांना विचारला.
राज्य परिवहन महामंडळाचे कामकाज टप्प्याटप्प्याने सुरू होत असून, मंगळवारी (दि.२) पेठरोडवरील एसटीच्या वर्कशॉपमध्ये काम करीत असलेल्या सर्वच्या सर्व २०० कर्मचाºयांना कामावर बोलाविण्यात आले होते. सर्व कर्मचारी कामावर हजर झाल्याने या कर्मचाºयांनी अधिकाºयांच्या या भूमिकेला तीव्र आक्षेप घेत १०० टक्के उपस्थितीमुळे फिजिकल डिस्टन्स नियमाचे पालन करणे कठीण होणार असल्याचे
सांगत कर्मचाºयांना सुरक्षिततेचे
पुरेसे साधने देण्यात आली नसल्याबाबतही आक्षेप घेतला.
सरकारने लॉकडाउन नियमावलीमध्ये बºयापैकी शिथिलता दिल्याने कामकाज हळूहळू सुरू होणार आहे. मात्र महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये काम करणाºया सर्वच कर्मचाºयांना एकाचवेळी कामावर बोलाविल्याने कर्मचाºयांनी
अधिकाºयांना जाब विचारला. कर्मचाºयांना हात धुण्यासाठी पाणीच नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याकडे अधिकाºयांचे लक्ष वेधले. यावेळी अधिकाºयांनी तत्काळ टॅँकरची व्यवस्था करीत पाणी मागविले. परंतु ही व्यवस्था तात्पुरती असून, स्वच्छतेसाठी पाणी अधिक प्रमाणात अपेक्षित असल्याने त्याची तजवीज अगोदरच करणे अपेक्षित होते, असे म्हणत नाराजी व्यक्त केली.
कर्मचाºयांना पुरेसा मास्क तसेच सॅनिटायझर नसल्याने कर्मचाºयांच्या आरोग्याकडे महामंडळाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत
कर्मचाºयांनी काम करण्यास विरोध केला.
--------------------------------------
कर्मचारी येणार कसे?
एसटी महामंडळाचे कर्मचारी हे शक्यतो महामंडळाच्या बसमधूनच कामावर येत असतात. सध्या बसेस बंद असल्याने कामावर येणार कसे, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे सर्वच कर्मचाºयांना कामावर न बोलाविता शासनाच्या नियमाप्रमाणे ३५ टक्के कर्मचारी कामावर बोलाविण्याची मागणी त्यांनी केली.
कर्मचाºयांना कामावर येण्यासाठी अधिकाºयांना त्यांची मनधरणी करावी लागली. कामावर न येणाºया कर्मचाºयांचे वेतन कपात करण्याचा इशारादेखील देण्यात आल्याने कर्मचाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
----------------------------
लॉकडाउन नियम शिथिल झाल्याने फॅक्टरी नियमाप्रमाणे कर्मचाºयांना कामावर बोलविण्यात आले आहे. एसटीची सेवा अत्यावश्यक सेवेमध्ये असल्याने या सेवेतील कर्मचाºयांना हजर राहणे क्रमप्राप्त ठरते. खासगी, सरकारी कार्यालयांचा नियम येथे लागू पडत नाही. महामंडळाच्या आदेशाने कर्मचाºयांना कामावर बोलविण्यात आले आहे.
- मुकुंद कुंवर, उपयंत्र अभियंता, विभागीय कार्यशाळा