वडाळीभोई येथे शंभर टक्के बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:02 AM2018-07-29T01:02:33+5:302018-07-29T01:02:48+5:30
तालुक्यातील वडाळीभोई येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शंभर टक्के बंद पाळण्यात आला. यावेळी मंडल अधिकारी शिलावट व पोलीस उपनिरीक्षक साळुंके यांना निवेदन देण्यात आले.
चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शंभर टक्के बंद पाळण्यात आला.
यावेळी मंडल अधिकारी शिलावट व पोलीस उपनिरीक्षक साळुंके यांना निवेदन देण्यात आले. या बंदमध्ये सर्वच व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांनी सहभाग नोंदविल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले. यावेळी सरपंच अनिता जाधव, सोसायटीचे सभापती सुखदेव जाधव, उपसरपंच निवृत्ती घाटे, नवनाथ जाधव, शिवाजी जाधव, चंद्रकांत अहेर, प्रदीप अहेर, डॉ. निवृत्ती अहेर, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, प्रमोद अहेर, निवृत्ती जाधव, दत्तात्रय जाधव, विजय जाधव, अर्जुन जाधव, जयराम जाधव, शांताराम जाधव आदींसह सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. बंद शांततेत संपन्न झाला. यावेळी उपनिरीक्षक साळुंके व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
त्वरित आरक्षणाची मागणी
मराठा समाजास त्वरित आरक्षण देऊन न्याय द्यावा, तसेच अरबी समुद्रात छत्रपतींच्या शिवस्मारकातील पुतळ्याची उंची कमी करू नये, आरक्षणाच्या होणाऱ्या दिरंगाईमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे यांनी आंदोलनात भाग घेत जलसमाधी घेतली. त्यांना शहीद घोषित करून त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची शासकीय मदत लवकरात लवकर मिळावी या मागणीसाठी वडाळीभोई येथे बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापाºयासह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.