चार लघुप्रकल्पांमध्ये शंभर टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 10:01 PM2020-08-06T22:01:19+5:302020-08-07T00:31:08+5:30
मालेगाव : शहराला पाणीपुरवठा करणारे गिरणा धरणात ११ हजार ८६६.८९ दलघफू एवढा जलसाठा आहे. धरण आतापर्यंत ५५ टक्के भरले आहे. तालुक्यातील सात लघुप्रकल्पांपैकी चार लघुप्रकल्प शंभर टक्के भरले असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शहरासह तालुक्यातील काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

शहराला गिरणा व चणकापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. चणकापूरचे पाणी तळवाडे साठवण तलावात साठविले जाते. शहराला दररोज ६५ दलघफू पाण्याची गरज असते. यातील ३० टक्के पाणी तळवाडे तर ७० टक्के पाणी गिरणा
धरणातून उचलले जाते. महापालिका हद्दीत ३९ जलकुंभ आहेत. शहरात ४१९ झोनद्वारे दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने मालेगाव तालुक्यातील लघुप्रकल्पातील जलसाठ्याची स्थिती बºयापैकी आहे. दहिकुटे, साकूर, लुल्ले, बोरेअंबेदरी प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. तर झाडी लघुप्रकल्प अद्यापही कोरडाठाकआहे. समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवीत दुंधे व अजंग प्रकल्पात अल्पसा जलसाठा शिल्लक आहे. तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणातील जलसाठ्याची स्थिती बºयापैकी आहे. आतापर्यंत ५२५.९९ मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. बुधवारी एका दिवसात सायंकाळपर्यंत मंडलनिहाय झालेला पाऊस मिली मीटरमध्ये असा : मालेगाव- २४, दाभाडी-२, वडनेर-१, करंजगव्हाण, झोडगे, कौळाणे-०, कळवाडी-७, सौंदाणे-४ असा झाला आहे. बुधवारी ५३ मि.मी. पाऊस तालुक्यात झाला.मोसम व गिरणा नदीला पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गिरणाधरणही ५५ टक्के भरले आहे. भविष्यातील पाणीटंचाई दूर होण्याचे चिन्हे असून शेती सिंचनाचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटल्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकºयांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.