मालेगावी वऱ्हाडींना वाटप केले चिमण्यांची शंभर घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:15 AM2021-03-16T04:15:02+5:302021-03-16T04:15:02+5:30
पर्यावरण संवर्धनासाठी मदत व्हावी या संकल्पनेतून चिमणीची घरकुले वाटप करण्याचा उपक्रम विवाह सोहळ्यात घेण्यात आला. येथील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या ...
पर्यावरण संवर्धनासाठी मदत व्हावी या संकल्पनेतून चिमणीची घरकुले वाटप करण्याचा उपक्रम विवाह सोहळ्यात घेण्यात आला. येथील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या नायब तहसीलदार रघुनाथ वाघ यांची कन्या आरती व वर हितेश निंबा अहिरे (रा. म्हसरूळ, नाशिक) यांचा विवाह सोमवारी पंचकृष्णा लाॅन्स येथे ५० जणांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी वाघ यांनी नाशिक येथील कारागीर संदीप बलसाणे यांच्याकडून १०० चिमणींची घरे तयार करून घेतली होती. लग्नात आलेल्या नवरीकडच्या ५० व नवरदेवाकडच्या ५० वऱ्हाडींना प्रत्येकी एक चिमणीचे घरकुल भेट देण्यात आले. एका घराच्या निर्मितीसाठी साधारणपणे १०० रूपये खर्च झाला आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे वाघ कुटुंबीयांचे कौतुक होत आहे.
===Photopath===
150321\15nsk_15_15032021_13.jpg
===Caption===
मालेगावी वाघ कुटुंबियांच्या लग्न सोहळ्यात वऱ्हाडी मंडळींना चिमणीचे घर भेट वस्तू म्हणून देताना नवरी आरती वाघ. समवेत सेवानिवृत्त नायब तहसीलदार रघुनाथ वाघ, दत्तात्रय काथेपुरी आदि.