१२२ दिव्यांगांना मिळाला ‘जयपूर फूट’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 05:05 PM2019-12-01T17:05:26+5:302019-12-01T17:12:27+5:30

ग्रामीण भागातील दिव्यांगांना कृत्रिम अवयव प्रत्यारोपणाबाबत फारशी माहिती नसते; मात्र लायन्सच्या या उपक्रमामुळे याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.

One Hundred twenty two handicappes got the support of 'Jaipur Foot' | १२२ दिव्यांगांना मिळाला ‘जयपूर फूट’चा आधार

१२२ दिव्यांगांना मिळाला ‘जयपूर फूट’चा आधार

googlenewsNext
ठळक मुद्देअपंग बांधावच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न

नाशिक : दुर्धर आजार किंवा अपघातामुळे आलेल्या अपंगत्वामुळे अनेकांना विविध समस्यांना तोंड देत परावलंबी जीवन जगावे लागते. यामुळे दिव्यांगांची होणारी मानसिकता लक्षात घेत सामाजिक बांधिलकी म्हणून शहरातील लायन्स क्लब आॅफ स्मार्ट सिटीच्या वतीने कृत्रिम अवयवांचे (जयपूर फूट) मोफत प्रत्यारोपण शिबिर रविवारी (दि.१) राबविण्यात आले. या शिबिरात जिल्ह्यातील १२२ गरजूंना कृत्रिम अवयव बसविण्यात आले.
पंडित कॉलनीमधील लायन्स सभागृहात कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिराचे उत्साहात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन प्रभारी जिल्हाधिकारी एस.भुवणेश्वरी, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, क्लबचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, उपप्रांतपाल अभय शास्त्री, माजी प्रांतपाल गिरीश मालपाणी, हसमुख मेहता आदी उपस्थित होते. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात गरजू नागरिकांची तंत्रशुद्ध पद्धतीने तपासणी करत ज्या अवयवाची गरज आहे, अशा अवयवाचे मोजमाप करून कृत्रिम अवयव तयार करून बसविण्यात आले. शिबिरात शहरासह ग्रामीण भागातूनही दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. यावेळी भुवनेश्वरी म्हणाल्या, ग्रामीण भागातील दिव्यांगांना कृत्रिम अवयव प्रत्यारोपणाबाबत फारशी माहिती नसते; मात्र लायन्सच्या या उपक्रमामुळे याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच गरजूंना स्वावलंबी जीवन जगण्यास मोठा हातभार लागणार आहे. अशाप्रकारचा उपक्रम समाजाला खरी ताकद देणारे असतात. दरम्यान, संस्थापक अध्यक्ष जयंत येवला, अध्यक्ष प्रमोद परसरामपुरीया, उपाध्यक्ष पंडित वाघ यांनी शिबिरात आलेल्या दिव्यांगांना कृत्रिम अवयव प्रत्यारोपणासाठी मार्गदर्शन केले.
--
दिव्यांग बांधावच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न
अपंगत्वामुळे येणार्या अडचणी लक्षात घेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या ििशबराच्या माध्यामातून या अपंग बांधवाच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी या उपक्र माचे आयोजन करण्यात येईल.- जयंत येवला, संस्थापक अध्यक्ष,Þलायन्स क्लब आॅफ स्मार्ट सिटी

Web Title: One Hundred twenty two handicappes got the support of 'Jaipur Foot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.