माणिकखांब शिवारात अपघातात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:14 AM2020-02-24T00:14:58+5:302020-02-24T00:45:41+5:30

मुंबई-नाशिक महामार्गावरील माणिकखांब शिवारात घोटीमार्गे नाशिकला जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी, तर दुसºयास किरकोळ दुखापत झाली. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

One injured in accident at Manikkhamb Shivar | माणिकखांब शिवारात अपघातात एक जखमी

माणिकखांब शिवारात अपघातात एक जखमी

googlenewsNext

घोटी : मुंबई-नाशिक महामार्गावरील माणिकखांब शिवारात घोटीमार्गे नाशिकला जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी, तर दुसºयास किरकोळ दुखापत झाली. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
घोटीकडून रामदास केशव शिंदे (४५) व भाऊसाहेब गिरे हे दुचाकीने (एमएच. १५ ईव्ही - ००९१ ) नाश्किकडे जात असतांना माणिकखांब शिवारातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील दुचाकी थेट दुभाजकावर चढल्याने चालक रामदास शिंदे हे तीस फूट उंचीवरून खाली फेकले गेले. त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. घटनेची माहिती घोटी पोलिसांना मिळताच सहाय्यक उपनिरीक्षक भीमा गांगुर्डे, हवालदार संदीप मथुरे यांनी घोटी टोलनाक्यावरील रु ग्ण वाहिकेने त्यांना तातडीने घोटी ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या रूग्णास तातडीने नाशिकला हलविण्यात आले. रविवार असल्याने घोटी ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर व परिचारीका उपस्थित असल्याने उपचारात अडचणी आल्या.
कंत्राटी कामगारांच्या भरवशावर घोटी ग्रामीण रु ग्णालयाचा कारभार सुरू रूग्णांची हेळसांड होत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: One injured in accident at Manikkhamb Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात