दारणा धरणाजवळील अपघातात एक ठार
By Admin | Published: April 22, 2017 12:09 AM2017-04-22T00:09:34+5:302017-04-22T00:17:56+5:30
बेलगाव कुऱ्हे : अस्वली स्टेशन ते साकूर फाटा या राज्य महामार्ग क्रमांक ३७वर दुचाकीच्या अपघातात साकूर येथील एक इसम ठार झाला.
बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशन ते साकूर फाटा या राज्य महामार्ग क्रमांक ३७वर दारणा धरणाजवळ झालेल्या दुचाकीच्या अपघातात साकूर येथील एक इसम ठार झाला.
गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास साकूर येथील रहिवाशी बाळू लहानू गोधडे (४५) हे दुचाकीने (क्र. एमएच १५ बीएफ ५९६६) महामार्गाने घराकडे जात होते. यावेळी दुचाकी खोल खड्ड्यात आदळल्याने त्यांना जबर मार लागला. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ नरेंद्र महाराज संस्थानचे रु ग्णवाहक निवृत्ती गुंड यांनी नाशिकच्या जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. मात्र गोधडे यांचा उपचारादरम्यान मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अधिक तपास वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बोडके, झाल्टे करीत आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या सिन्नर - शिर्डी या राज्य महामार्गावर सूचना फलक नाही. त्यामुळे आजपर्यंत अनेक अपघात झालेले आहेत. दारणा धरणाजवळ बांधलेल्या पुलाजवळ वळणामध्ये संरक्षण भिंती नसल्याने वाहने चालवण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे चारचाकी वाहनांचे अपघातदेखील यापूर्वी घडले आहेत.(वार्ताहर)