गुरेवाडी फाट्याजवळ अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:48+5:302021-02-05T05:49:48+5:30
----------------------- सिन्नरला ६६ जणांना कोरोना लस सिन्नर : येथील ग्रामीण रुग्णालयात पहिल्या दिवशी ६६ जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले. ...
-----------------------
सिन्नरला ६६ जणांना कोरोना लस
सिन्नर : येथील ग्रामीण रुग्णालयात पहिल्या दिवशी ६६ जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. डॉ. निर्मला पवार यांना प्रथम लस टोचण्यात आली. पहिल्या दिवशी ६६ जणांना लस टोचण्यात आली.
---------------------
अवजड वाहतुकीने लावली रस्त्याची वाट
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील वावी ते घोटेवाडी या चार किलोेमीटर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हा डांबरी रस्ता अक्षरश: मातीचा झाला आहे. समृध्दी महामार्गाच्या कामामुळे या रस्त्यावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून, क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक केली जात असल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
--------------------
आडवाडी येथे कृषी महोत्सव
सिन्नर : तालुक्यातील आडवाडी येथे जागतिक कृषी महोत्सवांतर्गत गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. शेतातील मातीची ताकद वाढविण्यासाठी रासायनिक औषधांना पर्याय म्हणून गोमूत्र, शेणखत यांचा वापर केला तर शेतकरी स्वावलंबी होईल, असे प्रतिपादन आबासाहेब मोरे यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, जयराम शिंदे, बाळासाहेब ठोक, सचिन गुंजाळ, रतन हांडोरे यांच्यासह मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.