पेठ मार्गावर अपघातात एक ठार; दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:06 AM2018-09-17T01:06:20+5:302018-09-17T01:06:36+5:30
नाशिक-पेठ राष्ट्रीय मार्गावरील पेठ शहराजवळील शनिमंदिर परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोन गंभीर जखमी झाले.
पेठ : नाशिक-पेठ राष्ट्रीय मार्गावरील पेठ शहराजवळील शनिमंदिर परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. पंचवटीतील शिवाजी चौकातील जितेंद्र चंद्रकांत कोडीलकर हे आपला भाचा शुभम देवरे समवेत नाशिकहून वापी ( गुजरात) येथे जाण्यासाठी ड्रिमयुगा मोटरसायकलने (क्र . एमएच १५जीडी ०८९३) जात असताना पेठपासून २ किमी अंतरावरील जाधव पाडाजवळ पेठकडून नाशिककडे जाणारी पेठ उस्थळे येथील विजय हिरामण पाडेकर (२३) व रोहिदास त्र्यंबक भोये(२४) यांची मोटरसायकल पल्सर कमांक- एमएज.१५ सीक्यु ७६०५ यांची समोरासमोर धडक झाली. या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असुन पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विजय साळी पुढील तपास करीत आहेत .
जखमींची प्रकृती चिंताजनक
डोक्यास मार लागलेले जितेंद्र कोडीलकर यांच्यावर पेठच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच त्यांचे निधन झाले . तर जखमी विजय पाडेकर व रोहीदास भोये यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नाशिकला रवाना करण्यात आले. पाणी जारचा व्यवसाय करणारे जितेंद्र कोडीलकर वापी येथे व्यावसायीक कामानिमित्त निघाले असतांना काळाने त्यांच्यावर झडप घातली.