सौंदाणे शिवारात अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:15 AM2020-12-31T04:15:09+5:302020-12-31T04:15:09+5:30

---- सूत व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या १२ जणांविरुद्ध गुन्हा मालेगाव : येथील नेहरू चौकात राहणाऱ्या सुधीर गंगाभिसन कलंत्री या सूत ...

One killed in an accident in Saundane Shivara | सौंदाणे शिवारात अपघातात एक ठार

सौंदाणे शिवारात अपघातात एक ठार

Next

----

सूत व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या १२ जणांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : येथील नेहरू चौकात राहणाऱ्या सुधीर गंगाभिसन कलंत्री या सूत व्यापाऱ्याची ३२ लाख २२ हजार ८५८ रुपयांची फसवणूक करणाऱ्या १२ जणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलंत्री यांच्या एआर टेक्सटाईल पार्टनशिपमधून मोहंमद अजहर रहेमतुल्ला, मोहंमद शाहीद रहेमतुल्ला, अन्सार उल्लाह रहेमतुल्ला, इम्रान अहमद अन्सार उल्लाह, नासिर कौसर मोहंमद अजहर, खुर्शिदा अन्सार उल्लाह, फकीरा मोहंमद शाहीद, वकार अहमद अन्सार उल्लाह, मोहंमद आबीद मोहंमद याकूब, तौसीफ अहमद मोहंमद अन्वर, आयेशा अंजूम, मोहंमद जावेद मोहंमद आदील यांनी सन २०१७ मध्ये ३२ लाख २२ हजार ८८५ रुपयांचे सूत विकत घेतले होते. त्या मोबदल्यात पैसे न देता धनादेश दिला होता; मात्र धनादेश बँकेत वठविण्यासाठी टाकला असता पेमेंट थांबवून फसवणूक करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास साहाय्यक पाेलीस निरीक्षक आव्हाड हे करीत आहेत.

-----

नोकरीचे आमिष दाखवून शिक्षिकेची फसवणूक

मालेगाव : येथील खुशामद पुरा भागातील सरदार प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी देण्याचे आमिष दाखवून डॉ. मंजूर हसन मोहंमद अय्युबी, श्रीमती परवीन डॉ. मंजूर अय्युबी, शाबाद अहमद शकील अहमद, नावीद अन्वर सगरी यांनी दोन टप्प्यांत १५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शगुफ्ता परवीन मोहंमद फारूख (रा. रौनकाबाद) या शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ हे करीत आहेत.

-----

तरुणीचा विनयभंग करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

मालेगाव : येथील स्वप्नपूर्तीनगर भागात तरुणीचा विनयभंग करणाऱ्या दर्शन गणेश अहिरे याच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. सटाणा रस्त्यावर रिक्षाने घराकडे जात असताना दर्शन अहिरे याने गाडी आडवी लावून पीडित तरुणीचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

-----

मालेगावी ४० हजारांच्या बॅटरी चोरीला

मालेगाव : येथील जुना आग्रा रोडवरील ए वन बॅटरी दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार २०० रुपये किमतीच्या १० बॅटऱ्या चोरून नेल्या. या प्रकरणी मोहंमद फारूख मोहंमद सालार यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.

Web Title: One killed in an accident in Saundane Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.