त्र्यंबकरोडवर अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 02:05 AM2019-06-19T02:05:59+5:302019-06-19T02:06:57+5:30
भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटून झाडावर आदळल्याने दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना त्र्यंबकरोडवर घडली. या अपघातात अन्य दोघेजण जखमी झाले आहे़
नाशिक : भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटून झाडावर आदळल्याने दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना त्र्यंबकरोडवर घडली. या अपघातात अन्य दोघेजण जखमी झाले आहे़ अशोकनगर येथील तुषार भाऊसाहेब शिंदे (२०) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे़ त्याच्यासोबत असलेले गोलू ऊर्फ सौरभ उपेंद्र सिंग (२२) आणि बागलाणचा दत्तात्रय गायकवाड हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तुषार शिंदे व त्याचे मित्र हे रविवारी (दि.१६) रात्री बाराच्या सुमारास नाशिकहून सातपूरच्या दिशेने एमएच १५ एफवाय ६४७४ क्रमांकाच्या दुचाकीवरून ट्रीपलसीट जात होते. रस्त्यात अचानक कुत्रा आडवा आल्यामुळे तुषारचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व अपघात घडला़
महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
देवळाली कॅम्प : लॅमरोड भाटीया महाविद्यालयाबाहेर अल्पवयीन विद्यार्थिनीला दमबाजी करत विनयभंग केल्याप्रकरणी पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॅमरोड भाटीया महाविद्यालयाबाहेर सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास विद्यार्थिनी उभी असताना संशयित आशिष शेवाळे हा तिच्याकडे येऊन तू माझ्याशी बोल असा दम देत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपनगरला गॉगल विके्रत्यास मारहाण
नाशिकरोड : उपनगर नाका येथील गॉगल विक्रेत्याने दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तिघा जणांनी विक्रेत्यास मारहाण करून त्याच्या स्टॉलची मोडतोड केली. मखमलाबाद कोळीवाडा येथील सिवान समीर पटेल (२२) हा युवक उपनगर नाका येथे गॉगल विक्रीचा व्यवसाय करतो. रविवारी दुपारी संशयित सचिन भडांगे, किरण भडांगे, लखन पवार यांनी गॉगल विक्रेता सिवान याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सिवान याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला लोखंडी गज, लाकडी दांड्याने मारहाण करून धारदार हत्याराने जखमी केले.
कारच्या धडकेने
वृद्धाचा मृत्यू
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील श्री घंटी म्हसोबा मंदिरासमोर कारने दुचाकीसह वयोवृद्धास धडक दिल्याने या अपघातात बाळकृष्ण कथ्थू जोशी (७५) रा. रत्नदीप रोहाउस, जयभवानीरोड यांचा मृत्यू झाला़ भरधाव वेगात जाणारी आयटेन कार (एमएच १५, इबी ६५९४)ने धडक दिल्याने मोटारसायकल (एमएच १५, इ १०५२) ला देखील धडक दिल्याने विशाल भाऊसाहेब वाघ रा. चेहेडी हादेखील जखमी झाला आहे.