दुचाकी अपघातात एक ठार
By admin | Published: March 25, 2017 04:45 PM2017-03-25T16:45:02+5:302017-03-25T16:45:02+5:30
द्वारकाकडून उपनगरकडे जात असताना दुचाकी घसरल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा दुपारी उपचारादरम्यान मृत्यू
Next
नाशिक : द्वारकाकडून उपनगरकडे जात असताना दुचाकी घसरल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा शुक्रवारी (दि़२४) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ गंगाधर तुकाराम गाडेकर (७६) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे़ नाशिक- पुणे मार्गावरील सिटीकेअर हॉस्पिटलसमोर २ डिसेंबर रोजी त्यांची दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. कुटुंबीयांनी त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते़ या अपघाताची भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़