भावंडांमधील तुंबळ हाणामारीत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:20 AM2021-02-17T04:20:46+5:302021-02-17T04:20:46+5:30

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिंदेगावातील नायगाव रोड येथे भास्कर शिवराम साळवे व रामचंद्र शिवराम साळवे हे दोन भाऊ ...

One killed in a brawl between siblings | भावंडांमधील तुंबळ हाणामारीत एक ठार

भावंडांमधील तुंबळ हाणामारीत एक ठार

Next

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिंदेगावातील नायगाव रोड येथे भास्कर शिवराम साळवे व रामचंद्र शिवराम साळवे हे दोन भाऊ आपापल्या कुटुंबासह एकमेकांच्या शेजारी राहतात. या दोन्ही भावांच्या कुटुंबामध्ये शेतीच्या हिस्से-वाटे करण्यावरुन मागील काही वर्षापासून वाद-विवाद सुरू आहेत. हे वाद इतके विकोपाला गेले की, सोमवारी (दि.१५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास संशयित रामचंद्र हे त्यांचा भाऊ भास्कर साळवे यांच्याकडे पाहून शिवीगाळ करीत होते. त्यामुळे भास्कर यांनी ‘शिव्या का देतो याचा जाब विचारला असता त्यांना संशयित रामचंद्रसह, पुतण्या देवीदास रामचंद्र साळवे, रंभाबाई रामचंद्र साळवे व नातु प्रफुल्ल विजय पाटील आणि आझाद विजय पाटील यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गुप्तांगावर जबर मार बसल्याने भास्कर अस्वस्थ होऊन खाली कोसळून बेशुध्द पडले. बेशुद्ध अवस्थेत वयोवृद्ध भास्कर शिवराम साळवे (७२) यांना तत्काळ नाशिकरोडच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. त्यांचा मुलगा संदीप उर्फ सनी भास्कर साळवे याने दिलेल्या फिर्यादीवरुन वरील संशयितांविरुध्द पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच खुनाच्या गुन्ह्यातील संशयित देविदास साळवे याने दिलेल्या फिर्यादीवरुन अन्य संशयितांविरुध्द मारहाणीचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे करीत आहेत.

--इन्फो--

खुनातील संशयितांना पाच दिवसांची कोठडी

भास्कर साळवे यांच्या खुनप्रकरणी पोलिसांनी संशयित देविदास साळवे, आझाद पाटील, प्रफुल्ल पाटील यांना अटक केली आहे. संशयितांना पोलिसांनी मंगळवारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

---

फोटो आर वर १६भास्कर नावाने सेव्ह केला आहे.

===Photopath===

160221\16nsk_60_16022021_13.jpg

===Caption===

मयत भास्कर साळवे

Web Title: One killed in a brawl between siblings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.