कार-दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 15:40 IST2019-05-29T15:39:21+5:302019-05-29T15:40:15+5:30
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर एसएमबीटी हॉस्पीटलजवळ कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

कार-दुचाकी अपघातात एक ठार
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर एसएमबीटी हॉस्पीटलजवळ कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. बोरखिंड विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष मुरलीधर तुळशीराम पाडेकर हे इगतपुरी येथे नातेवाईकातील एका विवाहानिमित्त आयोजित मांडवाच्या कार्यक्रमासाठी ते हिरोहोंडा मोटारसायकलने (क्र . एम. एच. १५, बी. बी. ९०४६) जात होते. मुंबईकडून सिन्नरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव होंडा अॅमेझ कारने (क्र . एम. एच. ०२ डी. जी. ०३९१) एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात पाडेकर यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच गतप्राण झाले. पाडेकर यांच्यावर बोरखिंड येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.