पहिणे पेगलवाडी दरम्यान अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 01:15 PM2019-07-26T13:15:19+5:302019-07-26T13:15:31+5:30
त्र्यंबकेश्वर : नाशिक त्र्यंबकेश्वर या महामार्गा लगत पेगलवाडी फाट्यावरु न पेगलवाडी पिहणे रस्त्यावर पेगलवाडी गावाजवळ बुधवार (दि. २४) रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान भरधाव वेगाने पहिणे बाजु कडे आपल्या पांढ-या रंगाच्या मारु ती व्हॅन क्र .एमएच १५ डीसी १९४५ ने जात रस्त्याने बेजबाबदार पणे जात असतांना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा क्रमांक एम.एच.१५ झेड्.८५७३ ही उभी असतांना भरधाव वेगात असलेल्या मारु ती व्हॅनने रिक्षााला जोरदार धडक दिली. त्यात असलेल्या रिक्शा चालक यशवंत बाळाजी भागवत (६५) रा.कोथेगल्ली त्र्यंबकेश्वर हा गंभीर जखमी होउन मरण पावला.
त्र्यंबकेश्वर :
नाशिक त्र्यंबकेश्वर या महामार्गा लगत पेगलवाडी फाट्यावरु न पेगलवाडी पिहणे रस्त्यावर पेगलवाडी गावाजवळ बुधवार (दि. २४) रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान भरधाव वेगाने पहिणे बाजु कडे आपल्या पांढ-या रंगाच्या मारु ती व्हॅन क्र .एमएच १५ डीसी १९४५ ने जात रस्त्याने बेजबाबदार पणे जात असतांना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा क्रमांक एम.एच.१५ झेड्.८५७३ ही उभी असतांना भरधाव वेगात असलेल्या मारु ती व्हॅनने रिक्षााला जोरदार धडक दिली. त्यात असलेल्या रिक्शा चालक यशवंत बाळाजी भागवत (६५) रा.कोथेगल्ली त्र्यंबकेश्वर हा गंभीर जखमी होउन मरण पावला. या बाबतची फिर्याद राजेश वामन शिरसाठ (४६) रा.माळी गल्ली लाल बहादुर शास्त्री चौक मखमलाबाद यांनी दिली आहे. यातील आरोपी मारु ती व्हॅन चालक नाव गाव समजले नाही. याच्या विरु ध्द पोलीसांनी आज (ता. २५) रोजी गुन्हा भा.द.वि.व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अनमुलवार
यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास बीट हवालदार संजय खैरनार
करीत आहेत.
दरम्यान मयत यशवंत बाळाजी भागवत हे त्र्यंबकेश्वर मधील सामाजिक कार्यकर्ते होत. त्यांच्या मागे पत्नी, सुन व दोन नातु व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. ,