चांदोरी गोदावरी नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 03:02 PM2019-10-10T15:02:46+5:302019-10-10T15:03:20+5:30

चांदोरी : येथील गोदावरी नदीपात्रात विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी ६ ते ७ च्या सुमारास पोहत असतांना बुडालेल्या विश्वनाथ माधवराव भुरकुडे (वय ५४) यांचा मृतदेह गुरुवारी नदी पात्रात आढळला.

 One killed in drowning in Chandori Godavari river basin | चांदोरी गोदावरी नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू

चांदोरी गोदावरी नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू

Next

चांदोरी : येथील गोदावरी नदीपात्रात विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी ६ ते ७ च्या सुमारास पोहत असतांना बुडालेल्या विश्वनाथ माधवराव भुरकुडे (वय ५४) यांचा मृतदेह गुरुवारी नदी पात्रात आढळला.
विश्वनाथ भुरकूडे हे चांदोरी येथील गोदावरी किनारी असलेल्या गढी येथे राहत होते. ते मंगळवारी विजयादशमीच्या दिवशी पोहण्यासाठी गेले असता घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांना सायखेडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्र ार दाखल केली होती. परंतु त्यांना नदीकडे जाताना बघितलं होत त्यामुळे त्याची बुडाल्याचा संशय असल्याने आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व पोलीस कर्मचारी बोटीच्या साहयाने त्यांनी नदीपात्रात शोध कार्य सुरू केले, दोन दिवस शोध कार्य सुरू असताना त्यांचे कुटुंबीय इतरत्र ही शोध घेत होते.
पुन्हा गुरु वारी आपत्ती व्यवस्थापन व पोलीस कर्मचारी यांनी नदी पात्रात शोधकार्य सुरू करण्यात आले व दुपारी १२.३० च्या सुमारास गोदावरी पात्रात वाहत जाऊन सायखेडा अमरधामच्या पाठीमागे खाली खडकात मृतदेह आढळून आला. भुरकुडे यांच्या पश्चात पत्नी , तीन मुली ,एक मुलगा असा परिवार आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे सागर गडाख ,फकिरा धुळे, किसन जाधव ,बाळू आंबेकर, शरद वायकांडे ,पिंटू डगळे,राजेंद्र टर्ले ,भाऊसाहेब मोरे ,विलास गांगुर्डे , वैभव जमधडे, सचिन कांबळे ,सुरजकुमार पगारे चांदोरीचे पोलीस पाटील अनिल गडाख ,सायखेडा पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ , उपनिरीक्षक तांबे , पोलीस कर्मचारी भारत पगारे, अंबादास काळे , प्रशांत वाघ, निवृत्ती खोडे, सोमनाथ पेखले ,सागर गिते आदींनी परिश्रम घेतले.

Web Title:  One killed in drowning in Chandori Godavari river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक