खोरी फाट्याला वाहनाच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:39 IST2020-12-02T21:54:25+5:302020-12-03T00:39:46+5:30
वणी : भरधाव अज्ञात वाहनाने वणी-सापुतारा रस्त्यावरील खोरी फाटा परिसरात दुचाकीला धडक दिल्याने कळवण तालुक्यातील इसम जागीच ठार झाला आहे.

खोरी फाट्याला वाहनाच्या धडकेत एक ठार
वणी : भरधाव अज्ञात वाहनाने वणी-सापुतारा रस्त्यावरील खोरी फाटा परिसरात दुचाकीला धडक दिल्याने कळवण तालुक्यातील इसम जागीच ठार झाला आहे.
बुधवारी (दि.२) सकाळच्या सुमारास वणी सापुतारा रस्त्यावर खोरी फाटा ते चौसाळे फाटा दरम्यान राउत यांच्या शेतजमिनीलगत कळवण तालुक्यातील देवळी कराड येथील कैलास गुनाजी गांगुर्डे हे दुचाकीवरुन जात असताना भरधाव वेगातील एका वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीर स्वरुपाचा मार लागल्याने कैलास गांगुर्डे यांचा मृत्यु झाला.
खोरी फाटा परिसरात टमाटा खरेदी विक्री केन्द्र आहे त्यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते त्यात सदर रस्त्याचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात झाले आहे. या रस्त्याचे काम अंतिम टप्यात आहे, त्यामुळे सिंमेंटच्या या रस्त्यावर भरधाव वेगात वाहने चालविण्याची जणु स्पर्धा लागलेली असते. दरम्यान अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात येत आहे.