नाशिकरोडला कौटुंबिक वादातून एकाची हत्या

By नामदेव भोर | Published: May 29, 2023 05:18 PM2023-05-29T17:18:13+5:302023-05-29T17:18:32+5:30

कौटुंबिक वादामुळे प्रविण दिवेकर १५ ते २० दिवसांपूर्वीपासून जेलरोड येथे एकटेच राहत होते. त्यांनी रविवारी रात्री जेवन झाल्यानंतर फोनद्वारे नातेवाईकांना संपर्क साधला होता.

One killed in a family dispute at Nashik Road | नाशिकरोडला कौटुंबिक वादातून एकाची हत्या

नाशिकरोडला कौटुंबिक वादातून एकाची हत्या

googlenewsNext

नाशिक : नाशिकरोड परिसरातील जेलरोड, दुर्गा मंदिरासमोर एका व्यक्तीची विळीने आणि काचेने मारून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आह. प्रवीण मधुकर दिवेकर ( ४३, रा. हेतल हाउसिंग सोसायटी, रामेश्वरनगर, दुर्गा मंदिरासमोर जेलरोड, नाशिकरोड) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते काही दिवसांपूर्वी मुंबई येथे राहत होते. मात्र त्यांची पत्नी उपनगर जेलरोड परिसरातील असल्याने ते मागील काही दिवसांपासून जेलरोड येथे राहत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

कौटुंबिक वादामुळे प्रविण दिवेकर १५ ते २० दिवसांपूर्वीपासून जेलरोड येथे एकटेच राहत होते. त्यांनी रविवारी रात्री जेवन झाल्यानंतर फोनद्वारे नातेवाईकांना संपर्क साधला होता. मात्र त्यांचे आई-वडील सकाळी मुंबईहून नाशिकला खरेदीसाठी आले असताना मुलाला भेटण्यासाठी ते हेतल सोसायटी येथे गेले. त्यावेळी त्यांना प्रवीण दिवेकर हे जमिनीवर रक्तभंबाळ अवस्थेत पडलेले आढळून आले. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे तसेच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक चौकशी केली असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे अज्ञात मारेकरींचा शोध सुरू आहे. दरम्यान, घटना ज्या इमारतीत घडली त्या इमारतीत प्रवेश करण्याचे दोन रस्ते असून पुढच्या रस्त्याला सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असली तरी मागील प्रवेशद्वाराला कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसल्याने दिवेकर यांच्या मारेकऱ्यांनी मागील द्वारानेच पळ काढला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: One killed in a family dispute at Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक