पिंपळगावी भीषण अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 22:44 IST2022-03-30T22:44:13+5:302022-03-30T22:44:30+5:30
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरातील शिर्डी - सुरत महामार्गावरील रानमळा शिवारात बुधवारी (दि. ३०) रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अज्ञात वाहनावरील चालकाने त्याचे वाहन पिंपळगाव बाजूकडून निफाडच्या दिशेने भरधाव वेगाने घेऊन जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणारी मोटरसायकल (एमएच १५ एचपी २३८१) धडक दिल्याने अपघातात मोटारसायकलस्वार सतीश विष्णू चौधरी (२९, रा. हरसूल, ता. पेठ) यास गंभीर मार लागल्याने तो जागीच मृत झाला, तर मोटारसायकल मागे बसलेला संजय निवृत्ती गोतरणे (२५, दाभुळे, ता. त्र्यंबकेश्वर) याच्या हाता-पायास व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यास तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.