वीज पडून एकाचा मृत्यू ; अंबई येथे १० शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 01:13 AM2021-10-08T01:13:00+5:302021-10-08T01:14:12+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यात मंगळवारी (दि.५) दुपारी सव्वातीनच्या सुमारास पावसाचे वातावरण भरुन सर्वत्र काळवंडून आले. विजांचा कडकडाट व पावसाच्या जोरदार सरी पडत असताना तालुक्यातील चंद्राची मेट येथील रामू रामचंद्र चंद्रे (४०) हा इसम घरी जात असताना अंगावर वीज कोसळल्याने जागीच ठार झाला. तर दुसऱ्या घटनेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबई गावात वीज काेसळून एका शेतकऱ्याच्या दहा शेळ्या ठार झाल्या.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात मंगळवारी (दि.५) दुपारी सव्वातीनच्या सुमारास पावसाचे वातावरण भरुन सर्वत्र काळवंडून आले. विजांचा कडकडाट व पावसाच्या जोरदार सरी पडत असताना तालुक्यातील चंद्राची मेट येथील रामू रामचंद्र चंद्रे (४०) हा इसम घरी जात असताना अंगावर वीज कोसळल्याने जागीच ठार झाला. तर दुसऱ्या घटनेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबई गावात वीज काेसळून एका शेतकऱ्याच्या दहा शेळ्या ठार झाल्या.
याघटनेनंतर अशोक राम जाधव यांनी घोटी पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनीवरून माहिती दिल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा होऊन शव विच्छेदनासाठी मृतदेह नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळी घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी घोटी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून अधिक तपास खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगताप करीत आहेत. दरम्यान तेथील तलाठ्यांनी पंचनामा करुन तहसीलदार त्र्यंबक यांना नैसर्गिक मृत्यू म्हणून अहवाल दिला आहे.
तसेच याच सुमारास अंबई (ता. त्र्यंबकेश्वर) येथील सुनील बाबुराव भुतांबरे या शेतक-याच्या दहा शेळ्या वीज पडून मृत्युमुखी पडल्या आहेत. याबाबतचा अहवाल तलाठी यांनी तहसीलदार यांच्याकडे पाठवला आहे.