मालेगावमध्ये विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 08:48 AM2019-07-06T08:48:04+5:302019-07-06T08:48:31+5:30
मालेगाव मध्य शहरातील बोहरा कब्रस्तान समोर रात्री विद्युत तार तुटून खांबात प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागल्याने एक ठार तर 12वर्षीय मुलगा जखमी झाला आहे.
नाशिक - मालेगाव मध्य शहरातील बोहरा कब्रस्तान समोर रात्री विद्युत तार तुटून खांबात प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागल्याने एक ठार तर 12वर्षीय मुलगा जखमी झाला आहे.जखमी मुलावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.शकिल अहमद मुक्तार अहमद अन्सारी (64)रा.गुलशेर नगर असे मृताचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की शकिल अहमद मुक्तार अहमद अन्सारी हे चंदनपुरी गेट ते मरीमाता मंदिर रस्त्याने जात असताना बोहरा समाज कब्रस्तान समोर असलेल्या विद्युत खांबावरील विजवाहिनी तार तुटून पडली.तुटलेल्या तारेवर शकिल अहमद व मोहम्मद यासीन एकबाल अहमद (12)रा.हिरापुरा या दोघांचा पाय पडल्याने विजेचा धक्का बसला.यात मोहम्मद यासीन हा बाजुस फेकला गेल्याने बेशुद्ध पडला तर शकील अहमद यांनी खांबाचा आश्रय घेतला.मात्र खांबामध्येच विज प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागल्याने ते जागीच ठार झाले तर मोहम्मद यासीन हा बेशुद्ध पडला.नागरिकांनी दोघांना उपचारार्थसामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी शकिल अहमद यांना तपासुन दाखलपुर्व मयत घोषीत केले.
महावितरणच्या दुरुस्ती विभागाच्या चालढकल कार्यपध्दतीमुळे शकील अहमद यांचा जीव गमावला असुन दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.यापुर्वीही शहरातील कमालपुरा येथे वीजवाहिनीची तार तुटून अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाला होता.गत महिन्यात बापु गांधी नगर येथे खांबात वीजप्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागुन शेळी गतप्राण झाली होती.विद्दुत कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य माणसाला आपला जीव गमवावा लागतो आहे.त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.