टाके घोटीजवळ अपघातात एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 10:57 PM2021-11-15T22:57:42+5:302021-11-15T22:58:17+5:30

घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील टोलनाक्याजवळील टाके घोटी हद्दीतील सीमा हॉटेलसमोर घोटीवरून मोटारसायकलवरून टाके घोटी येथे घरी जात असतांना सोमवारी (दि.१५) रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान भरधाव असलेल्या कंटेनरने जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.

One killed, one seriously injured in an accident near Taki Ghoti | टाके घोटीजवळ अपघातात एक ठार, एक गंभीर

प्रदीप भगत

Next
ठळक मुद्देएक गंभीर जखमी झाला आहे.

घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील टोलनाक्याजवळील टाके घोटी हद्दीतील सीमा हॉटेलसमोर घोटीवरून मोटारसायकलवरून टाके घोटी येथे घरी जात असतांना सोमवारी (दि.१५) रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान भरधाव असलेल्या कंटेनरने जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.

मुंबई-आग्रा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून दररोज घोटी-इगतपुरी दरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. खंबाळेजवळील अपघातात ४ जण दगावल्याची घटना ताजी असताना सोमवारी या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. सायंकाळी मोटारसायकलवर जाताना कंटेनर (डीडी ०१ सी ९२०५) जोराची धडक दिल्याने या अपघातात प्रदीप चंद्रकांत भगत (१६, रा. टाके घोटी) हा अपघातात ठार झाला तर त्याचा जोडीदार विनायक खंडू भगत (२४, रा. टाके घोटी) हा गंभीर जखमी झाला असून त्यास पुढील उपचारासाठी तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती कळताच खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांनी त्वरित रुग्णवाहिका चालक नंदू जाधव यांच्या मदतीने तातडीने घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना घोटी येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी एकाला मृत घोषित केले तर दुसरा गंभीर जखमी असल्याने नाशिक येथे हलविण्यात आले.

घटनास्थळावरून कंटेनर चालक फरार झाला असून त्याचा शोध इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, उपनिरीक्षक राजेंद्र दिवटे, मुकेश महिरे हे घेत आहेत.
 

Web Title: One killed, one seriously injured in an accident near Taki Ghoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.