सौंदाणे-देवळा रस्त्यावर अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:57 PM2020-03-09T23:57:44+5:302020-03-09T23:58:18+5:30
देवळा : तालुक्यातील सौंदाणे फाटा -देवळा रस्त्यावर दहीवड फाट्यानजीक झालेल्या दुचाकीच्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक अशोक भदाणे ठार झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : तालुक्यातील सौंदाणे फाटा -देवळा रस्त्यावर दहीवड फाट्यानजीक झालेल्या दुचाकीच्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक अशोक भदाणे ठार झाले. सोमवारी (दि . ९) दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान मेशी विहीर बस दुर्घटनेपासून एक किमी अंतरावर धोबीघाट परिसरात हा अपघात झाला. देवळा येथे सकाळी सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्यानंतर ते कामावर जाण्यासाठी निघाले. चिंचवे येथे जात असतांना अशोक अर्जुन भदाणे (५७) यांच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने देवळा येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले . तेथे ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून देवळा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. भदाणे हे देवळा येथील सामाजिक वनीकरण विभागात वनरक्षक होते. भदाणे यांचे खिरमाणी ( ता. सटाणा ) हे मूळ गाव, सद्या ते चांदवड येथे वास्तव्यास होते. दोन महीन्यांनंतर ते सेवानिवृत्त होणार होते .त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नातू असा परीवार आहे .सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर चांदवड येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.