विंचूर जवळील दरोड्यात एक ठार; मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:38 AM2021-01-10T11:38:58+5:302021-01-10T11:39:10+5:30
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे जोडपे घरात एकटीच होते.
नाशिक: येथून जवळच असलेल्या भरवस फाटा येथे रात्री दोनच्या सुमारास पडलेला दरोड्यात कारभारी आबाजी जगताप(69) यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी अलका कारभारी जगताप या गंभीर जखमी झालेल्या आहेत. येवला रस्त्यालगतच जगताप यांचे घर आहे. पोलिस तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे जोडपे घरात एकटीच होते. त्यांची मुलं दोन मुलं शेतात वेगळया ठिकाणी राहतात. यावेळी सकाळी उठवायला गेले असता हा प्रकार लक्षात आला. जखमी अलका यांच्या जबाबानंतर सदर घटनेचा उलगडा होणार आहे पोलीस घरफोडी की खून या दिशेने तपास करीत आहे. याप्रकरणी डीवायएसपी सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक रंगनाथ सानप, पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, यांसह पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.