गोंदे दुमाला येथील अपघातात एक ठार , सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 02:36 PM2020-01-12T14:36:21+5:302020-01-12T14:37:03+5:30
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथील व्हिटीसी फाट्याजवळी झालेल्या अपघातात एक जण जागीच जण ठार तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे चार ते पाच च्या दरम्यान घडली आहे.
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथील व्हिटीसी फाट्याजवळी झालेल्या अपघातात एक जण जागीच जण ठार तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे चार ते पाच च्या दरम्यान घडली आहे.
अशातच अचानक मुंबईहून -नाशिककडे मागुन भरधाव वेगाने येणा-या कंटेनर क्र मांक (एम.एच. ४३.बी.पी.१४८५) या कंटेनरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याला उभी असलेल्या झायलो गाडीला जोरदार धडक दिल्याने या झालेल्या अपघातात ास जबर मार लागल्यामुळेझायलो गाडीचा चालक राजभार झब्बार (वय २८, कांदिवली, मुंबई.) हा जागीच ठार झाला.तर चंद्रशेखर लालधारी यादव.(वय३३. जोगेश्वरी,मुंबई), सुमनकुमार धनंजय झा.(वय २४, बोईसर, मुंबई), धर्मेद्रकुमार रामाशंकर गोळ (३०, कांदिवली, मुंबई) , पिंटू ओमप्रकाश सिंग (२५, कांदिवली, मुंबई) , ललितकुमार शिवप्रसाद पाल (वय २८), तर अन्य एकाचे नाव समजू शकले नाही.असे सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान अपघाताची माहिती गस्त घालत असलेल्या वाहतूक पोलिसांना कळताच त्यांनी सदर अपघाताची माहिती वाडिव-हे पोलिस स्टेशनला कळवले.यानंतर लगेचच गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड पाटील यांना अपघाताची माहिती मिळताच तातडीने अपघातस्थळी धाव घेत जखमींना रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले.सदर फरार असलेल्या कंटेनरच्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वाडिव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्विजत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.